आता हा आनंद मातृभाषेतही, भारतीय भाषेत अभियांत्रिकी शिक्षण प्रशंसनीय

हिंदी व अन्य भारतीय भाषांप्रती त्यांना आस्थाच उरली नाही. शिक्षणात स्वभाषेचा वापर करणारे देश मागे पडल्याचे दिसत नसताना आम्हीच केवळ इंग्रजीचा आग्रह धरावा हे न उलगडणारे कोडे आहे.

  देशाची अस्मिता व स्वाभिमानासोबत निगडित असलेले मुद्दे विचारार्य घेण्यास का विलंब लागतो. कळायलाच मार्ग नाही. भारतीय भाषांमध्ये असामान्य क्षमता व सामर्थ्य असताना अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच अन्य शिक्षण इंग्रजीत शिकविण्याची गरजच नाही. यामागे अशी मानसिक विकृती काम करीत आहे की, जी ब्रिटिशांची गुलामगिरी अजूनही मान्य करण्यात धन्यता समजतात.

  हिंदी व अन्य भारतीय भाषांप्रती त्यांना आस्थाच उरली नाही. शिक्षणात स्वभाषेचा वापर करणारे देश मागे पडल्याचे दिसत नसताना आम्हीच केवळ इंग्रजीचा आग्रह धरावा हे न उलगडणारे कोडे आहे.

  अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण इंग्रजी सोडून अन्य भाषेत शिक्षण होऊ शकत नाही हा विचारच गुलामी जोपासणारा आहे. आता भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नव्या शैक्षणिक वर्गापासून हिंदी व मराठी तसेच इतर आठ भाषांमधून अभियांत्रिकीच्या शिक्षणाला मंजुरी दिली आहे. हा निर्णय घेण्यासाठी सरकारला ७५ वर्षांचा कालखंड लागला. देश जेव्हा स्वतंत्र झाल्यानंतर सरकार हा निर्णय घेऊ शकले असते. आता विलंबाने का असेना निर्णय झाला त्याचे स्वागतच झाले पाहिजे.

  वैद्यकीय विज्ञानात असेच व्हावे

  इंग्रजीत वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडणारे अनेक डॉक्टर रुग्णांची भाषा समजू शकत नाहीत. आपल्या भाषेत होणारा त्रास कथन करताना त्यांची तारांबळ उडते. रुग्णाला होणार त्रास त्याच्या भाषेत डॉक्टरला समजला तर उपचारही चांगले होतात. डॉक्टर जेथे प्रॅक्टिस करतो तेथील भाषा त्याला अवगत असावी.

  आज तांत्रिक शब्दांची अडचणच उरली नाही. त्यामुळे अन्य भाषेत वैद्यकीय शिक्षण होऊ शकत नाही हे कारणच नाही हे कारणच नाही. की, मराठी ,हिंदी भाषेत तसेच इतर भाषेत ते सुयोग्य प्रकारे होऊ शकते.

  आज विद्यार्थी व प्राध्यापक असेही नाहीत की, जे थेट ब्रिटनमधून उतरले. आपलेच शिक्षक अन आपलेच विद्यार्थी असल्यामुळे शिक्षण आपल्या भाषेत होणे गरजेचे आहे. ती आपली निकड आहे. वैद्यकीय शिक्षण आपल्या भाषेत झाले की, त्याची गुणवत्तादेखील नक्कीच वाढेल. आरोग्य सेवा यातून सुधारेल.

  सर्वच देशात स्वभाषेचा वापर

  चीन, रशिया, जर्मन, फ्रान्स, जपानमध्ये तसेच अन्य देशांतसुद्धा अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर शिक्षण आपापल्या भाषेतच दिल्या जाते. तेथे इंग्रजीचा एक शब्दही उच्चारला जात नाही.

  मातृभाषेत शिक्षण मिळाले की, ते अधिक बोधप्रद होते. ते सहज समजते. दुसऱ्या भाषेतील तांत्रिक शब्दांचा स्पीडब्रेकर राहत नाही. आधी इंग्रजी शिकून घ्या अन मग त्याभाषेतून दुसरे तांत्रिक शिक्षण घेणे हे उरफाटे काम आहे. ते आता बंद झाले यात आनंद आहे.

  भारतीय भाषेत तांत्रिक शिक्षण ही तर आता क्रांतीच समजावी लागेल. अभियांत्रिकेचे शिक्षण हिंदी, मराठी, गुजराती, बांगला, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळममध्ये आता घेता येईल. हीच व्यवस्था आता वैद्यकीय शिक्षणात सुरू व्हावी.

  Now this joy is appreciated even in mother tongue engineering education in Indian language