काँग्रेस-राष्ट्रवादी तणातणीच्या मार्गावर

माजी काँग्रेसाध्यक्ष राहूल गांधी यांनी चीन घुसखोरीवरुन नरेंद्र मोदींसह भाजपला चौफेर घेरले असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र त्यांच्या आरोपांच्या ट्यूबमधील हवाच

 माजी काँग्रेसाध्यक्ष राहूल गांधी यांनी चीन घुसखोरीवरुन नरेंद्र मोदींसह भाजपला चौफेर घेरले असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र त्यांच्या आरोपांच्या ट्यूबमधील हवाच काढली. १९६२ च्या युद्धानंतर चीनने भारताचा ४५ हजार कि.मी भाग भाग बळकवला आहे. अद्यापही चिनने तो सोडला नाही असे स्पष्ट करुन शरद पवारांनी राहूल गांधी यांचे कान टोचले. पवारांच्या या वक्तव्याने भारतीय जनता पक्षाला बळ मिळाले हे तेवढेच खरे. पूर्वीच्या काळात मी असतांना काय घडले याचा मी विचार करतो मगच बोलतो असे स्पष्ट करुन राहूल यांना बालिश ठरविण्यात पवार विसरले नाहीत. राहूल गांधी यांचे नाव न घेता पवारांनी राष्ट्रीय सुरक्षेत राजकारण आणून बालीशपणा करु नये असे स्पष्ट केल्यामुळे साहजिकच काँग्रेसमध्ये भुवया उंचावल्यात. महाराष्ट्रात सत्तास्थानी भाजप नको या एकमेव मुद्दयावर महाआघाडीचे बिजारोपण करणाऱ्या शरद पवारांनी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे कान टोचल्यामुळे या पक्षात धुरळा उडणारच होता. 

कॅबिनेटच्या बैठकीतही काँग्रेसची तूती वाजत नाही. वाजली तर ती कुणी फार मनावर घेत नाही. निर्णयात्मक धोरणात महाराष्ट्रात काँग्रेस नाही असे उद्धार मध्यंतरी गांधी यांनी काढताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पवारही गोंधळले होते. आता महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच पवारांच्या वक्तव्याची स्पष्टता उभी केल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी संघर्ष अटळ समजला गेला. हा संघर्ष वाढला पवारांचे विधान भाजपच्या पथ्यावर पडल्यामुळे आता त्यांचे कान टोचण्याची जबाबदारी काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावर कुणाला न देता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महाआघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविली आहे. आरोप प्रत्यारोपात सौम्य असलेल्या बाळासाहेब थोरातींनी पवारांच्या तोडीस तोड असे एक विधान केले. चीन मुद्द्यांवर पवारांचे मत स्पष्ट नाही. असे वक्तव्य करुन त्यांनी पवारांना गोलमाल नेत्यांच्या पंगतीला बसविले. थोरातांच्या वक्तव्याचे राष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटत असले-नसले तरी राज्यात मात्र आता काँग्रेस-राष्ट्रवादीत तणातणी सुरु होण्याची शक्यता बळावली आहे. राहूल यांनी नरेंद्र मोदींवर आरोपांची झड लावली. तेव्हा त्यांना पोषक असणारे वक्तव्य न करता शरद पवारांनी नरेंद्र मोदींना क्लिन चिट द्यावी हे राष्ट्रीय स्तरावर पचनी पडणार नव्हते. महाराष्ट्रात काँग्रेसच्या थरथरत्या हातावर महाआघा़डीचे सरकार उभे आहे.