पंतप्रधानांचे धोनीला पत्र, इतर सर्वांसाठी प्रेरणादायक

पंतप्रधानांनी धोनीला लिहिलेले पत्र त्याच्या नावे त्यांचे संबोधन असले तरी भारतीय तरुणांना प्रोत्साहित करणारे हे पत्र एक ऐतिहासिक दस्ताएवेज ठरले आहे. पंतप्रधान म्हणाले, आपण आठवणीत ठेवणारे विक्रम आजच्या तरुणांसाठी ठेवा ठरले आहेत. वर्तमान भारतीय तरुण प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची हिंमत ठेवतात. अत्यंत कठीण परिस्थितीत ते एकमेकांना सहकार्य करीत आहेत.

भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवृत्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या आत्मीयतेने त्यांना भावनात्मक पत्र लिहिले त्याला तोड नाही. मनःपुर्वक लिहेलेले हे पत्र म्हणजे धोनीच्या विक्रमांनाही लाजविणारे आहे. पंतप्रधानांचा प्रत्येक शब्द मायेची ऊब आहे अन पित्याची सावली आहे. महेंद्र आणि नरेंद्र या दोघांचे क्षेत्र निरनिराळे असले तरी दोघेही सेल्पमेड आहेत. दोघेही कर्तृत्वाने मोठे झाले आहेत. दोघांच्या कठोर परिश्रमाला सलामच करावा लागेल. पंतप्रधानांचे धोनीला काही गोष्टी स्पष्ट करणे अत्यंत सार्थक आहेत. न्यू इंडियाचे चित्र सागर करणाऱ्यांपैकी आपण एक आहोत असे धोनीला पंतप्रधान म्हणाले. नशिबात नव्हे तर स्वकतृत्वाने आपण स्वतःला घडविले. धोनी तुम्ही त्या असंख्य खेळाडूंना प्रेरीत केले ज्यांच्याकडे कष्ट उपासण्याशिवाय दुसरे काहीच नाही. भारताच्या यशस्वी कप्तानांपैकी आपण एक आहात. तुमच्या प्रयत्नांनी भारत क्रमांक एकवर पोहोचला. देश आपणाला पुढील काही पिढ्या तर नक्कीच विसरु शकणार नाही. आपणण जगविख्यात खेळाडूच्या पंक्तीला बसला आहात. जगातील सर्वश्रैष्ठ विकेट किपरपैकी आपण एक आहात याचा परमानंद आहे.
पंतप्रधानांनी धोनीला लिहिलेले पत्र त्याच्या नावे त्यांचे संबोधन असले तरी भारतीय तरुणांना प्रोत्साहित करणारे हे पत्र एक ऐतिहासिक दस्ताएवेज ठरले आहे. पंतप्रधान म्हणाले, आपण आठवणीत ठेवणारे विक्रम आजच्या तरुणांसाठी ठेवा ठरले आहेत. वर्तमान भारतीय तरुण प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची हिंमत ठेवतात. अत्यंत कठीण परिस्थितीत ते एकमेकांना सहकार्य करीत आहेत. धोनीच्या हिंतीची दाद देताना पंतप्रधान म्हणाले की, आपण कित्येकदा रिस्क घेऊन अत्यंत दबाव असताना अनेकांना क्रिकेटमध्ये संधी उपलब्ध करुन दिली. सन २००७ टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये शेवटचा ओव्हर असताना आपण जोगिंदर शर्माला चेंडू दिला. त्याने फलंदाजाची विकेट घेऊन भारताला विजय मिळवून दिला. धोनीने या प्रकारे स्टम्पच्या मागे राहून युजवेंद्र चहल व कुलदीप यादवसारख्या बॉलर्सना मार्गदर्शनही केले होते.
सैन्या सोबत लगाव
पंतप्रधान म्हणाले की, धोनी तुमचे देशाच्या सैन्यदलासोबत आंतरिक नाते आहे. आर्मीसोबत जोडल्या जाताच आपण अत्यंत आनंदी दिसलात. संकटातून बाहेर काढणारा आपण एक मार्ग आहात. खासकरून २०११ वर्ल्ड कपच्या आठवणी देशाच्या स्वप्नात कायम आहेत. देश की वर्तमान पिढी निर्णयक्षमता असणारी आहे. ते हिंमत सोडत नाहीत. आम्ही तुमच्या खेळात हे सर्व पाहून आहोत. पंतप्रधानाच्या पत्रावर उत्तरादाखल धोनी म्हणाला की, एक कलावंत, जवान व खेळाडूला नेहमीच वाटते की आपले शौर्य, मेहनत व बलिदानाला देशाने आठवणीत ठेवावे. आपण जो स्नेह दाखविला त्याबद्दल आपले आभार, असे धोनीने पंतप्रधानांच्या पत्रावर ट्विट केले.
काही विक्रम असे
नागपूरमध्ये २०१९ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचे ३८ ओव्हर मध्ये ३ विकेट १३२ रन्स झाले आहेत. जिंकण्यासाठी ११९ रन्सची गरज होती. कुलदीप यादवच्या २ चेंडूंना मॅक्सवेलने सीमापार केले. धोनीने यादवला इशारा केला की जमिनीवर समांतर असा फ्लॅट बॉल टाक. यादवने तसेच केले. मॅक्सवेल बिग शॉट मारण्याच्या चक्करमध्ये विकेट गमावून बसला. दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये द. आफ्रिकेने १०७ रन्सवर सर्व विकेट गमावल्या होत्या. पण डुमिनी २५ रनवर ग्राऊंडवर दाटून होता. चहलने एक गुगली व २ चेंडू ऑफ लाईनवर टाकले. नंतर धोनीने चहलला थेट स्टंपवर चेंडू टाक म्हटले. या चक्करमध्ये डुमिनी एलबीडब्लू झाला. विरोधी चमूचे लूकहोल्स जाणण्याची ताकद धोनीत होती.