पंतप्रधानांचे ट्विटर असुरक्षित, हॅकरकडून अकाऊंट हॅकचे दुःसाहस

हॅकरचे दोन प्रकार आहेत. एक ऍथिकल तर दुसरा अनऍथिकल. दोघेही शार्पशूटरसारखे असतात. जेबकट जसा खिसा कापताना अता-पता लागू देत नाही असेच काहीसे त्यांचे असते. हॅकरने पंतप्रधानांचे अकाऊंट हॅक करुन कोरोना व्हायरस रिलिफ फंडात दान स्वरुपात बिटकॉईन किंवा क्रिस्टो करंसीची मागणी केली.

सर्वोच्च पदावरील व्यक्तीला धक्के देण्याचे काम होत असेल तर सामान्य स्तरावरील स्थितीचा अंदाज पंतप्रधानाच्या हॅक झालेल्या ट्विटर अकाऊंटने दिला आहे. नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक ( account hacking from hackers) झाल्यामुळे देशव्यापी खळबळ उडणारच. मोदीचे हे अकाऊंट नरेंद्र मोदी डॉट इन सोबत लिंक होते. (PM’s Twitter insecure) केंद्रसरकारने ११८ चिनी अॅपवर बंदी आणताच पंतप्रधानांचे ट्विटर अकाऊंट हॅक होणे हा योगायोग म्हणता व समजता येणार नाही. या संदर्भात काही तथ्य समोर येत आहेत. अधिकाऱ्यांच्या मते हे अकाऊंट पंतप्रधानांचे अधिकारिक हॅन्डल नाही. तरीपण जो हॅकर पंतप्रधानाच्या पर्सनल हॅन्डलपर्यंत पोहोचतो तो त्यांच्या अधिकारिक हॅन्डलपर्यंत कधीही पोहचू शकतो. अता हा धोका सहज घेता येणार नाही. यापुढे पंतप्रधानांची प्रायव्हेट वेबसाईट व अॅप ट्विटर हॅन्डलला हॅक करण्याच्या प्रयत्नांना आधीच हाणून पाडावे लागेल. यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा काय वापर केल्या जाऊ शकतो हे अधिकाऱ्यांनी पाहावे.

हॅकरचे दोन प्रकार आहेत. एक ऍथिकल तर दुसरा अनऍथिकल. दोघेही शार्पशूटरसारखे असतात. जेबकट जसा खिसा कापताना अता-पता लागू देत नाही असेच काहीसे त्यांचे असते. हॅकरने पंतप्रधानांचे अकाऊंट हॅक करुन कोरोना व्हायरस रिलिफ फंडात दान स्वरुपात बिटकॉईन किंवा क्रिस्टो करंसीची मागणी केली. त्याने २५ लाख फॉलोअर्स असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पर्सनल वेबसाईट ट्विटरवर नमूद केले की, पंतप्रधान रीलिफ फंडामध्ये दान करा. असी मी आपणास विनंती करतो. ट्विटरने पीएमच्या अकाऊंटचे हॅकिंग मान्य केले आहे. या ट्विटरसोबत अन्य काहींनाही हॅक करण्यात आले आहे. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या संदर्भात सर्वांग चौकशी होत आहे.

हॅकर म्हणाला, माझे नाव जॉन विक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटर अकाऊंटवर हॅकरने लिहिले की, आयडीने जॉन विकने हॅक केली आहे. वास्तविक जॉन विक हॉलिवूडमधील एका पात्राचे नाव. हॅकर म्हणाला की, आम्ही पेटीएम मॉल हॅक केले नाही. हॅकरने काही विचार करुनच पेटीएम मॉलचा उल्लेख केला आहे. २३ ऑगस्ट रोजी सायबर सिक्युरिटी फर्म साईबरने दावा केला की, पेटीएम मॉलच्या डेटा चोरीत जॉन विक ग्रुपचा हात आहे. पेटीएम मॉल युनिकाने पेटीएम इ कॉमर्सची संपत्ती आहे. सायबरने दावा केली की या हॅकर ग्रुपने काही खंडणी मागितली होती. पेटीएम ग्रुपने नंतर दावा केला होता की, त्यांच्या डेटामध्ये हेराफेरी झाली नाही.

अमेरिकेत अनेक बड्या हॅकिंग

गेल्या जुलै महिन्यात अमेरिकेत फार मोठी व आश्चर्यचकित करणारी हॅकिंग झाली होती. तेव्हा मायक्रोसॉफ्टचे को-फाऊंडर बिल गेट्स, टेस्लाचे सीईओ एलन मस्क, अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस व अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासह अनेकांचे अकाऊंट हॅक झाले होते. अॅपल-उबेरवरही अटॅक झालेत. हॅकर्सने क्रिस्टोकरंसी फ्रॉडसाठी १३० अकाऊंटवर निशाणा साधला होता. यापैकी ४२ वर ट्विटही केले होते.

राजकीय पक्षांवरही घाला

आधी भाजप-काँग्रेससारख्या बड्या राजकीय पक्षांसह सरकारी विभागाच्या वेबसाईट हॅक करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी कुणी जबाबदारी घेण्यासाठी पुढे आले नाही.