संशयकल्लोळातील राजकीय भेटीगाठी; या भेटीमागे दडलंय काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief Sharad Pawar) यांची त्यांच्या घरी जाऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (leader of opposition Devendra Fadnavis) यांनी भेट घेतल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीस यांनी मुक्‍ताईनगरला (Muktainagar) भाजप सोडलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Ex BJP Leader Eknath Khadse) यांच्या घरी जाऊन खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांच्याशी चर्चा केली . त्यामुळे तर या चर्चेला (discussion) आणखीन हवा मिळाली आहे.

    फडणवीस यांनी पवारांशी झालेल्या भेटीची माहिती देताना ती एक औपचारिक भेट होती असे नमूद केले आहे. मात्र ही भेट होत असताना मराठा आरक्षण प्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयातून आलेला निकाल आणि न्यायालयाने ओबीसींचे रद्द केलेले अतिरिक्त आरक्षण हे विषय सध्या सर्वोच्च चर्चेत आहेत.

    कोरोनाची स्थिती गंभीर असली तरीसुद्धा एखाद्याने ठाम भूमिका घेतली तर आंदोलनाचा भडका उडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राजकीयदृष्टया हे वाद संवेदनशील बनले आहेत. त्यातच पदोन्नतीतील आरक्षणावरून अनुसूचित जातीतील काही घटकांमध्येही धुसफूस सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासारखा नेता महाराष्ट्रात काही अनुचित घडेपर्यंत शांत राहील असे वाटत नाही.

    त्यामुळे या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पवारांनी आधी मुख्यमंत्र्यांची आणि नंतर विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा केली असण्याचीही शक्‍यता आहे. त्यामुळे राजकीय वातावरण जरी तंग असले तरीही सामाजिक वातावरण त्याहून अधिक धुमसत आहे हे लक्षात घेऊन राज्यातील प्रभावी घटकांशी चर्चा करण्याचा पवारांनी प्रयत्न केला असेल. मात्र त्यावर कोणाचा विश्‍वास बसणार नाही इतकी राजकीय चर्चा गेले १८ महिने महाराष्ट्रात सुरू आहे.

    या सत्तांतराच्या गोष्टी तर रोजच होत असतात. विरोधी पक्षाकडून सातत्याने वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या जातात. चंद्रकांत पाटील त्यामुळेच कोणत्याही क्षणी सत्तांतर होण्याची शक्‍यता बोलून दाखवली आहे. या चर्चेतून फडणवीस यांनी स्वतःला यापूर्वीच बाजूला करून घेतलेले आहे. हे सरकार आपापसातील अंतर्विरोधाने कोसळेल, आम्हाला काही करायची गरज नाही असे फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर त्यांना पत्रकारांनी पुढच्या तारखा विचारायचे बंद केले.

    जेव्हा जेव्हा दोन्ही काँग्रेस किंवा शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू होते तेव्हा तेव्हा आपोआपच सरकारमधील अंतर्विरोधाकडे लक्ष वेधले जाऊन त्यांनी व्यक्‍त केलेल्या शक्‍यतेवर चर्चा सुरू होते. त्यामुळे अलीकडच्या काळात फडणवीसांना तारखा जाहीर कराव्या लागलेल्या नाहीत. त्यामुळे हा योग चुकला. पुढचा कधी असे प्रश्‍न त्यांच्याबाबतीत तरी बंद झाले आहेत.

    यापूर्वी बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या सोबतीने नितीश कुमार यांनी सत्ता स्थापन केली होती. तेव्हा त्या सरकारमध्ये कसा भ्रष्टाचार सुरू आहे याबाबतीत एक जोराचा प्रपोगंडा भाजपाने राबवला होता. नेम तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलावर असायचा आणि टीका नितीशकुमार यांच्यासारखी चारित्र्यवान व्यक्ती या सरकारमुळे बदनाम होते अशी असायची. तेथेही केंद्रीय यंत्रणांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. नंतर एक क्षण असा आला की, या बदनामीपेक्षा भाजपासोबतच सत्ता स्थापन करू असा निर्णय घेत नितीश कुमारांनी स्वतःची प्रतिमा सांभाळत खुर्चीसुद्धा टिकवली.

    भाजपाला महाराष्ट्राची सत्ता हवी आहे. त्यासाठी त्यांनी कधी राष्ट्रवादी तर कधी शिवसेनेच्या मंत्र्यांना टागेंट केले आहे. अर्थात आघाडी सरकारमधील मंत्रीही स्वतःच्या वागणुकीतून विरोधी पक्षाचे काम हलके करतात. त्यामुळे भाजपाबाबतीत आधीच सरकारमध्ये संशयकल्लोळ आहे. कधी पवार भाजपाला मिळतील असे भासवले जाते तर कधी ठाकरे.

    याचमुळे यापूर्वीही प्रफुल्ल पटेल यांच्यासह शरद पवारांशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चर्चा झाल्याची बातमी आली आणि त्यावर शाह यांनीही संदिग्ध वक्तव्य करून चर्चेला हवा दिली. याच दरम्यान जावडेकर, हर्षवर्धन, गोयल हे मंत्री आणि भाजपाचे काही आजी माजी खासदार उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टोकाची टीका आणि राजीनाम्याची मागणी करत होते.

    Political encounters in skepticism What is behind this visit