इस्रायली शेतीत राजकीय खिचडी!

इस्रायल देशाला गेल्या दोन वर्षात चार वेळा निवडणुकांना सामोरे जावे लागले आहे. बहुमत कोणत्याही एका पक्षास नसल्याने काळजीवाहू : सरकार आणि विशिष्ट काळानंतर निवडणुका हे सत्र या देशात सुरूच आहे. गेल्या मंगळवारी झालेल्या चौथ्या निवडणुकीनंतर आता पाचव्यांदा पुन्हा येत्या काळात निवडणुकांना सामोरे जावे लागणार की काय, या शंकेने इस्रायली जनता हैराण झाली आहे. इस्रायली संसद जिला *नेसेट ' म्हणून ओळखले जाते तेथे एकूण १२० प्रतिनिधी निवडले जातात. सत्तेसाठी स्पर्धेत असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षास संसदेवर बहुमत मिळवून सत्ता स्थापण्यासाठी किमान ६१ जागांवर विजय मिळविणे आवश्यक असते. मंगळवारच्या निवडणुकीत आतापर्यंत इस्रायलचे पंतप्रधान राहिलेल्या बेंजामिन नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षास ९० टक्के मतमोजणी झाल्यानंतर ३० जागा मिळण्याची शक्‍यता आहे.

    बहुमताधारित सरकार स्थापण्यासाठी किमान ६१ जागांची आवश्यकता असल्याने त्यांना इतर पक्षांची मदत घेणे अनिवार्य आहे. प्रमुख विरोधी पक्ष ‘येश अतिद’ या लेपिड यांच्या पक्षास १८ जागा मिळतील. या तफावतीमुळे तसेच बहुमतासाठीच्या मोठय़ाच कमतरतेमुळे पक्ष कार्यक्रम, धोरणे, नीती या पलीकडे जाऊन मोठय़ा तडजोडी करण्याची वेळ नेतान्याहू यांच्यावर आली आहे. शिवाय इतके करूनही बहुमत मिळवणे शकय नसेल तर मग पाचव्यांदा निवडणूक अटळ आहे. इस्नायळच्या निवडणूक पद्धतीत उमेदवारांऐवजी पक्षाला मत असा निकष आहे आणि जनतेची मते निवडणूक रिंगणात असलेल्या १२ पक्षातून इतस्ततः विखुरलेली आहेत.

    मतदानाच्या बाबतीत अशा पद्धतीने विमनस्क असलेले इस्रायली जनमानस एकीकडे कुठलाही पक्ष संपूर्ण विश्‍वासार्ह नाही हे दर्शवून दुसरीकडे नकळत पुन्हा निवडीची संधी मागत आहे आणि निवडणुकीचे चक्र इस्रायलच्या इतिहासात कधी नव्हते इतके गतिमान झाले आहे. एकप्रकारे तेथील लोकशाहीची ही सत्त्वपरीक्षाच आहे. इस्रायलमध्ये नेतान्याहू यांचे जे पाठीराखे आहेत त्यांना वाटते की, देशासमोर असलेली अनेक राजकीय, मुत्सद्देगिरी व सुरक्षाविषयक आव्हाने झेलण्यासाठी नेतान्याहू हे एकमेव पात्र नेते आहेत तर त्यांच्या विरोधकांचे मत असे आहे की, नेतान्याहू हे अतिशय खोटारडे, मस्तवाल प्रवृत्तीचे नेते आहेत, ज्यांच्या आघाडीतील पक्षांच्या विश्‍वासघातामुळे देश सातत्याने निवडणुकांना सामोरा जात आहे. नेतान्याहूंना संसदेत असे कट्टर पाठीराखे हवे आहेत की, जे त्यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत (जो खटला ५ एप्रिलला सुरू होणार आहे) त्यांना अभय देतील.

    या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या राजकीय निरीक्षकांनी जे अंदाज वर्तविले आहेत त्यानुसार नेतान्याहू यांचा लिकूड पक्ष आणि त्याचे अतिउजवे, कट्टर, पुराणमतवादी साथीदार पक्ष हे आघाडीसाठी एकत्रित आले तरी ही आघाडी जास्तीत जास्त ५९ जागांपर्यंत जाऊ शकेल. याउलट नेतान्याहू यांचे विरोधी पक्ष जर एकत्र आळे तर ती विरोधी आघाडी ६१ हा बहुमताचा आकडा गाठू शकेल. मात्र, अखेरचा निकाळ जाहीर होईपर्यंत आणि नंतर ही आकडेवारी कायम राहिली तरी विरोधी आघाडी एकत्र येऊन सत्तेवर ताबा मिळविण्याच्या शक्‍यता खूपच कमी आहेत. कारण या संभाव्य विरोधी आघाडीत कट्टर ज्यू वादी, अरबवादी मुस्लीम, धर्मनिरपेक्ष, राष्ट्रवादी असे वेगवेगळय़ा विचारधारेचे पक्ष असतील आणि विचारधारेतील परस्पर विरोधामुळे अशी आघाडी मूलतः उभी राहणेच दिवास्वप्न आहे. इस्रायळ डेमॉक्रसी इन्स्टटय़ूटचे अध्यक्ष योहानान प्लेसनर यांनी निवडणूक निकालांवर एक महत्त्वपूर्ण भाष्य करताना म्हटले आहे.