Farooq's true face is coming

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी नुकतेच असे वक्तव्य केले आहे की, चीनच्या मदतीलने काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याचा प्रयत्न करु, कलम ३७० आणि कलम ३५ ए पुन्हा लागू करणे आणि जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले. फारुख यांनी थोडाही विचार केला नाही की, भारताच्या सार्वभौमत्वामध्ये जगातील कोणतीही देश हस्तक्षेप करु शकत नाही.

भारतासारख्या उदार आणि सहिष्णू देशात काही लोक गद्दारीची भाषा बोलत आहेत. अशी भाषा बोलून ते त्यांचा विश्वासघातकीपणाच जाहीर करीत असतात. या लोकांना देशातील जनता कधीच सहन करणार नाही. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी नुकतेच असे वक्तव्य केले आहे की, चीनच्या  (China) मदतीलने काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याचा प्रयत्न करु,  (370 articles in Kashmir) कलम ३७० आणि कलम ३५ ए पुन्हा लागू करणे आणि जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले. फारुख यांनी थोडाही विचार केला नाही की, भारताच्या सार्वभौमत्वामध्ये जगातील कोणतीही देश हस्तक्षेप करु शकत नाही. आमच्या देशाचे संविधान संसदेने सर्वसंमतीने ठराव पारित करुन कलम ३७० कायमस्वरुपी रद्द केलेले आहे. या कलमान्वये भारत आणि जम्मू-काश्मीरमध्ये नेहमीच दूरत्वाची भावना निर्माण करुन ठेवली होती. या कलमानुसार जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता. विशेष दर्जाच्या नावावर अब्दुल्ला आणि मुफ्ती परिवाराने मनमानी कारभार केला. त्याच्या सरकारच्या कार्यकाळातच हुर्रियत कॉन्फरन्ससारख्या भारताविरोधी अतिरेकी चळवळीचा उदय झाला. कलम ३७० रद्द केल्यामुळेच आता जम्मू-काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य झाले आहे.

गद्दारी सहन केली जणार नाही

जम्मू-काश्मीरला आता केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा आहे. काश्मीरचा सर्वांगीण विकास गतीने होत आहे. रस्त्याने नवीन जाळे तयार होत आहे. काश्मीरवरील घराण्यांची सत्ता संपुष्टात आल्यामुळे तेथील दहशतवादी कमी होऊ लागला आहे. आता फारुख अब्दुल्ला ज्याप्रकारचे वक्तव्य करीत आहेत, त्यावरुन त्यांचे मानसिक संतुलन बिघडले की काय, अशी शंका येते. फारुख हे मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत असे वाटते. काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करावे, हे सांगणारा चीन कोण होतो? जम्मू-काश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे. मोदी सरकार काश्मीरचा सर्वांगीण विकास करुन फारुखला त्यांची जागा दाखवून देईल.

कलम ३७० मुळेच मिळाले दहशतवाद्यांना बळ

जोपर्यंत काश्मिरात कलम ३७० लागू होते. तोपर्यंत तेथे देशातील इतर कोणत्याही राज्यातील व्यक्ती राहू शकत नव्हते किंवा उद्योगधंदाही सुरु करु शकत नव्हते. तेथील संपत्ती दुसऱ्या राज्यातील व्यक्तींना खरेदी करता येऊ शकत नव्हती. यामुळेच तेथे कोणीही गुंतवणूक करु शकले नाही किंवा तेथे उद्योगही निर्माण झाले नाही. जम्मू-काश्मीरमध्ये केवळ पर्यटनासाठीच जाता येत होते. शिक्षण, स्वास्थ्य, कृषी, व्यापार इत्यादी क्षेत्रात काश्मीर मागे पडले. केंद्राकडून काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असल्यामुळे मोठी आर्थिक मदत मिळत होती. परंतु सत्तेत असलेले नेतेच केंद्राकडून मिळणारी ही मदत हडप करीत होते. परिणामी राज्याचा विकास होऊ शकला नाही. ३७० कलमाचा आधार घेऊन लाखो हिंदूंना (काश्मिरी पंडितांना) काश्मीर खोऱ्यातून हाकलून देण्यात आले. संपत्तीचा त्याग करुन त्यांना शरणार्थी शिबिरात राहावे लागले. या कलमामुळे काश्मिरात देशद्रोही शक्तींना बळ मिळत गेले.

स्वार्थी राजकारणाचा शेवट

आता जम्मू-काश्मीर संरजामशातून मुक्त झाले आहे. अब्दुल्ला घराण्याच्या, शेख अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला या तीन पिढ्यांनी जम्मू-काश्मीरची सत्ता भोगली. मुफ्ती मोहम्मद सईद आणि त्यांची मुलगी मेहबूबा मुफ्ती यांनी राज्याच्या सत्तेचे सुख भोगले. हे सर्व नेते जनतेला सुख-सोई उपलब्ध करुन देण्याऐवजी केंद्र सरकारला सतात ब्लॅकमेल करीत होते. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी तर सर्व मर्यादाच ओलांडल्या होत्या. केंद्रातील व्ही.पी.सिंग सरकारमध्ये गृहमंत्री झाल्यानंतर त्यांची चौथ्या दिवशीच त्यांची मुलगी रुबिया सईद यांचे नाट्यमयरित्या अतिरेक्यांनी अपहरण केले. तिला सोडवण्यासाठी तुरुंगातील काही जहाल अतिरेक्यांना मुक्त करण्याची अतिरेक्यांची मागणी मंजूर करण्यात आली. काश्मिरात दहशतवाद फोफावत असताना फारुख अब्दुल्ला मात्र लंडनमध्ये ऐश-आराम करीत होते. वेळोवेळी त्यांनी पाकिस्तापूरक भूमिका घेतलेली आहे. फारुख, उमर, मुफ्ती सईद आणि मेहबूबा जेव्हा सत्तेत होते. तेव्हा काश्मिरात तिरंगा ध्वज फडकविणे अशक्यच होत. श्रीनगरच्या बख्शी स्टेडियमवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामध्ये ध्वजारोहण करुन ध्वज त्वरित उतरविण्यात येत होते. कलम ३७० लागू असताना काश्मिरात ही परिस्थीती होती.