jyotiraditya shinde

इंग्रजाप्रति स्वामीभक्ती दाखविण्याचे हे उत्कृष्ट उदाहरण होते. इ.स. १८५६ च्या इंग्रजासोबत झालेल्या लढाईत नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेविरुद्ध लढत असताना ग्वाल्हेरचे राजघराणे झाशीच्या राणीला मदत करण्याऐवजी इंग्रजांच्या बाजूने उभे राहिले होते. हा या राजघराण्याचा कलंकित इतिहास आहे.

ग्वाल्हेर येथील शिंदे घराणे नेहमीच सत्तेसोबत राहत आले आहेत. ब्रिटिशांच्या शासनकाळात ग्वाल्हेरचे शिंदे राजघराणे इंग्रजांसोबत निष्ठावान होते. या घराण्यातील एका राजाने तर त्यांचे नाव जॉर्ज शिवाजीराव शिंदे असे ठेवले होते. इंग्रजाप्रति स्वामीभक्ती दाखविण्याचे हे उत्कृष्ट उदाहरण होते. इ.स. १८५६ च्या इंग्रजासोबत झालेल्या लढाईत नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेविरुद्ध लढत असताना ग्वाल्हेरचे राजघराणे झाशीच्या राणीला मदत करण्याऐवजी इंग्रजांच्या बाजूने उभे राहिले होते. हा या राजघराण्याचा कलंकित इतिहास आहे. त्यावेळी ग्वाल्हेरचे राजघराणे राणी लक्ष्मीबाईच्या बाजूने उभे राहिले असते तर इंग्रजांचा निश्चितच पराभव झाला असता. परंतु ते नियतीला मंजूर नव्हतेच. आता मध्यप्रदेशात विधानसभेच्या २८ मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसची साथ सोडून भाजपाला मदत करीत आहेत. ज्योतिरादित्य शिंदेंचे या मतदारसंघात मोठमोठे मेळावे होताहेत. ते काँग्रेसवर टीकास्त्र सोडत भाजपाला साथ देत आहेत.

कमलनाथ आणि दग्विजय सिंगामुळेच काँग्रेस सोडली

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्याचे ना मुख्यमंत्रिपद मिळाले ना उपमुख्यमंत्रिपद कमलनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद गेले. त्यानंतर कमलनाथ आणि दिग्विजयसिंग यांनी ज्योतिरादित्य यांची सतत उपेक्षाच केली. शिंदे यांना प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदीसुद्धा नेमण्यात आले नाही. उ.प्र. निवडणुकीत त्यांच्यावर पूर्वांचलची जबाबदारी सोपविण्यात आली, परंतु तेथेही काँग्रेसचा पराभव झाला. राहूल गांधी यांचासुद्धा अमेठीत पराभव झाला. परंतु ते वायनाड येथून मात्र विजयी झाले. ज्योतिरादित्य निराशेतून भाजपामध्ये दाखल झाले. आता भाजपाला ते त्यांचे जुने घर असल्याचे सांगत आहे. काँग्रेसमध्ये असताना भाजपावर प्रखर टीका करणारे ज्योतिरादित्य आता मात्र भाजपाचे गुणगाण करीत आहेत. हे आहे त्यांचे राजकारण!

भाजपा आमचे जुने घर आहे!

भाजपा हे आमच्या घराण्याचे जुने निवासस्थान आहे. माझी आजी विजयाराजे शिंदे या भाजपाच्या संस्थापक सदस्य होत्या. माझे वडील माधवराव शिंदे यांनीही त्यांची राजकीय सुरुवात तत्काळीन जनसंघापासूनच केली होती. अशाप्रकारे आमच्या घराण्याचा भाजपासोबत जुना संबंध आहे. मी नवीन घरात आलो आहे. हे खरे आहे. परंतु या घराशी तुमचे जुने नाते आहे. असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. गेल्या ६-७ महिन्यांपासून राज्यातील तळागाळातल्या कार्यकर्त्यांसोबत संबंध स्थापित करण्याचा आपला प्रयत्न सुरु असून येत्या ३ नोव्हेंबर रोजी काँग्रेसला त्याचे उत्तर मिळेल.

संधीचा लाभ घेणे आवश्यक

शिंदे परिवाराने भाजपा आणि काँग्रेसमध्ये राहून नेहमीच सत्तासुख उपभोगले आहेत. राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या आशीर्वादाने मध्यप्रदेशात जनसंघाच्या काळात वीरेंद्रकुमार सकलेचा, कैलाश जोशी आणि सुंदरलाल पटवा यांच्या नेतृत्वाखाली सरकार पाडण्यासाठी काँग्रेसमध्ये फूट पाडून विंध्यप्रदेशचे नेते कॅप्टन अवधेशप्रताप सिंह यांचा मुलगा गोविंद नारायण सिंह यांच्या नेतृत्वात संयुक्त विधायक दल स्थापन केले होते. त्यावेळी झालेल्या सत्तापरिवर्तनात मोठ्या प्रमाणावर पैसा वाटला गेला होता. आणीबाणीच्या काळात रामता विजयाराजे शिंदे तुरुंगात होत्या, परंतु माधवराव शिंदे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माधवराव शिंदे यांनी भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव केला होते. माधवराव राजीव गांधी यांच्या निकटवर्तीय गोटात गेले परंतु त्यांची आई विजयाराजे शिंदे, यशोधरा राजे शिंदे, बहीण वसुंधरा राजे मात्र भाजपामध्ये होत्या. जनसंघ आणि भाजपाच्या स्थापनेत राजमाता विजयाराजे यांची प्रमुख भूमिका होती.