सोनू सूदच्या सेवेवर शिवसेनेचा तीर, सर्वच सेवाभावी संस्था अवाक

जर एखाद्या व्यक्ती सदिच्छा व परोपकाराच्या भावनेतून चांगले काम असेल तर त्याला शाबासकी द्यावीच लागेल. त्याच्या कामाला दाद द्यावी लागेल. त्याचे कौतुक करावे लागेल. त्याला कामाला दाद द्यावी लागेल,

 जर एखाद्या व्यक्ती सदिच्छा व परोपकाराच्या भावनेतून चांगले काम असेल तर त्याला शाबासकी द्यावीच लागेल. त्याच्या कामाला दाद द्यावी लागेल. त्याचे कौतुक करावे लागेल. त्याला कामाला दाद द्यावी लागेल, त्याचे कौतुक करावे लागेल, त्याला आडव्या हाताने घेता येणार नाही. उठ सूठ कुणालाही कोसणाऱ्यांना त्याला तरी कोसता येणार नाही. यात राजकारण नको. समाजसेवा, लोककल्याणावर कुणाची ठेकेदारी नाही. राजकारण्यांनी स्वत: कोरडे पाषाण राहावे पण इतरांच्या मायेच्या ओलाव्यावर आग पेटवू नये. संकटकाळी अनेकांची इच्छा कुणाला मदत करतात. त्यांच्या ठायी संवेदना असते. अशीच संवेदना सिनेसृष्टीत खलनायकाचे काम करणाऱ्या सोनू सूद यांच्या ठायी आहे. त्यांनी कोरोना संकटात आपल्या गावी न जाऊ शकणाऱ्या प्रवासी मजुरांना गावी जाण्यासाठी मदत केली. बिहार-उत्तरप्रदेशात पायी निघालेल्या व्यक्तींना त्याने गाड्या उपलब्ध करुन दिल्यात. संकटकाळी त्यांना बाहेर काढले. साहजिकच मग सोनूचे देशभरातून कौतुक होऊ लागले. पण त्यांचे कौतुक राजकारण्यांना मात्र आवडले नाही. त्यांच्या अपमानास्पद शब्दांनी सोनू घायाळ झाला. यातूनच सर्वच समाजसेवी संस्था अवाक झाल्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, सोनू सूदच्या मागे निवडणूकीत सोनू सूद भाजपचा प्रचारही करु शकतो. कुण्या राजकीय पक्षाच्या पाठबळाविना एवठे मोठे काम होऊ शकत नाही. 

जे काम केंद्र व राज्य करतांना दमले ते एक व्यक्ती साध्य करु शकत नाही. राऊत पुढे म्हणाले की, मी जर सोनू सूदच्या बाबत शंका उपस्थित केली तर कुणाच्या नाकाला मिरच्या झोंबण्याचे कारण नाही. जर झोंबल्या असतील तर माझा तीर अचूक निशाण्यावर लागला असे समजावे. आता ही गोष्ट चांगलीच म्हणावी की, राज्यपाल कोश्यारींनी सोनूला राजभवनावर बोलावले. राजभवनावर अशा महात्म्याला बोलावण्याची गरज आहे. पण मुंबई व महाराष्ट्रात असेही लोक आहेत की, ज्यांच्यासोबत चर्चा करण्याची गरज आहे. आता लॉकडाऊनमध्ये विमान, ट्रेन बसेस बंद आहेत तेव्हा सोनूने लोकांना कशाने नेले? लोकांच्या मनात शंका होती म्हणून ती मी विचारली असे राऊत म्हणाले