devendra fadnavis

मुंबईतील एका हॉटेलमध्ये शिवसनेचे नेते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते व राज्याचे माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये २ तास चर्चा झाली. या चर्चेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले आहेत. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घ्यायची केवळ या भेटीमागील हेतू होता का? संजय राऊत यांचे हे म्हणणे खरे वाटत नाही.

महाराष्ट्राचे राजकारण (Politics) सध्या अस्थिरतेकडे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झालेले आहेत. ज्येष्ठ नेत्यांच्या ज्या भेटीगाठी (meeting) होत आहेत. त्याचे प्रयोजन काय असेल आणि त्यातून कोणते परिणाम पुढे येणार आहे? राज्याच्या राजकारणात यामुळे कोणते परिवर्तन होणार आहेत? अशा भेटीगाठी केवळ परस्परांवर दबाव टाकण्यासाठी तर नाही किंबहुना हा राजकीय ब्लॅकमेल करण्याचा भाग तर नाही ना? हे सर्वकाही गोपनीय सुरु नसून उघडपणे या भेटीगाठी सुरु आहे. नेत्यांच्या या भेटीगाठीबद्दल आपापल्यापरीने तर्कवितर्क लावल्या जात आहेत. एकीकडे या भेटीगाठी सामान्य असल्याचे बोलले जात आहेत. परंतु काही लोक या भेटींना राजकीय खेळी समजतात.

मुंबईतील एका हॉटेलमध्ये शिवसनेचे (Shiv Sena) नेते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते व राज्याचे माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis-Raut meeting) यांच्यामध्ये २ तास चर्चा झाली. या चर्चेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले आहेत. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घ्यायची केवळ या भेटीमागील हेतू होता का? संजय राऊत यांचे हे म्हणणे खरे वाटत नाही. खरं म्हणजे मुलाखतीसाठी वेळ दूरध्वनी किंवा मोबाईलवर बोलूनही घेता येत होता. भाजपा आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेच्या मुखपत्रासाठी मुलाखत घेण्याची एवढी कोणती आवश्यकता होती? शिवसेनेची भाजपासोबत जी जवळीक निर्माण होत आहे त्याच्याबद्दल राष्ट्रवादीमध्ये खळबळ होणे स्वाभाविक आहे. ते दोन्ही पक्ष पुन्हा युती करण्याचा विचार तर करीत नसावे? असे झाले तर महाराष्ट्रातील महाविकास सरकारला धोका होऊ शकतो.

शरद पवारांनी घेतली दखल

संजय राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बेचैन झालेले आहेत. शरद पवार यांनी दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांच्याशी ४५ मिनिटे चर्चा केली. शिवसेना पुन्ही भाजपासोबत युती करण्याचा तयारीत तर नाही ना? शिवसेना महाआघाडी सरकारमध्ये खरोखरच संतुष्ट आहे का? दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार पाडण्याचा भाजपचा कोणताही उद्देश्य नाही. असे स्पष्ट केले. राज्यातील लोक महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाबद्दल असंतुष्ट आहेत. हे सरकार त्यांच्याच अकार्यक्षमतेमुळे कोसळतील असे भाकीतही फडणवीस यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविलेली आहे. त्यामुळे त्यांचे सध्या बिहारकडे लक्ष आहे.

काँग्रेसही अस्वस्थ

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सुद्धा फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीमुळे अस्वस्थ झालेले आहेत. त्यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसची कठोर भूमिका

फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजिद मेमन यांनी असा इशारा दिला की, राज्यातील विद्यमान सरकार हे काही एका पक्षाचे नाही. शिवसेना एकट्याचेच सरकार चालवत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस त्यांचे सहकारी पक्ष आहेत. शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयकांची भूमिका पार पाडत असल्यामुळे आघाडी सरकारला धोका नाही.