Shiv Sena wants Sharad Pawar to be UPA chief nrvb
शिवसेनेची इच्छा : शरद पवार व्हावे युपीए प्रमुख

राकाँचे वरिष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर सर्वच नेत्यांना आनंद होईल. शरद पवारांना ४ वेळा देशाचे पंतप्रधान होण्याची शंधी चालून आली होती. परंतु, घराणेशाहीच्या राजकारणामुळे त्यांना या पदापासून दूर ठेवण्यात आले.

महाराष्ट्राचे दिग्गज नेते शरद पवारांना युपीएचे चेअरमन बनविण्यासाठी शिवसेना प्रयत्न करीत आहे.या मागे काँग्रेसला दूर ठेवण्याची चाल दिसून येत आहे. शरद पवारांची शिवसेना नेते नेहमी प्रशंसा करीत असतात. यामागे काँग्रेस पक्षाला प्रभावहीन करण्याचा शिवसेनेचा उद्देश आहे. गेल्या १२ डिसेंबर रोजी पवारांचा ८० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना राकाँचे वरिष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर सर्वच नेत्यांना आनंद होईल. शरद पवारांना ४ वेळा देशाचे पंतप्रधान होण्याची शंधी चालून आली होती. परंतु, घराणेशाहीच्या राजकारणामुळे त्यांना या पदापासून दूर ठेवण्यात आले.

शरद पवारांवर स्तुती सुमनांचा वर्षाव

संजय राऊत यांनी राकाँ प्रमुख शरद पवारांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. ते म्हणाले की, पवार स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून इतर पक्षाचे नेते घेत आहेत.  पवारांच्या नेतृत्वाखालील राकाँला सोडले तर युपीएमधील अन्य घटक पक्षांमध्ये कोणतीही हालचाल दिसत नाही. शिवसेनेच्या मुखपत्रानेही शरद पवारांना युपीएचे अध्यक्ष बनविण्याची शिफारस केलेली आहे. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्‍त होत आहे.

याबाबत आपलं मत नोंदविण्यासाठी क्लिक करा

माजी मंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नसीमखान यांनी म्हटले आहे की, शिवसेना युपीएचा घटकपक्ष नाही, त्यामुळे सेनेला असा कोणताही सल्ला देण्याचा अधिकार नाही. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी म्हटले आहे की, शिवसेनेने प्रथम हे ठरवावे की, शिवसेना एनडीएमध्ये आहे की, युपीएमध्ये आहे. शिवसेना म्हणते की, काँग्रेससोबत त्यांची आघाडी केवळ महाराष्ट्रातच आहे. कृषी कायद्यांबाबत शिवसेनेची दुहेरी भूमिका आहे.

एका सभागृहात सेना भाजपासोबत होती तर दुसर्‍या सभागृहात हा विषय जेव्हा चर्चेला आला तेव्हा शिवसेनेचे सदस्य गायब होते. शिवसेना जर युपीएची सदस्यच नाही तर युपीए चेअरमन कोण होईल, याची चिंता त्यांनी करायलाच नको. यावर राकाँ प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, शरद पवारांनी अगोदरच जाहीर केलेले आहे की, युपीएचा चेअरमन होण्याची आपली मुळीच इच्छा नाही. त्यामुळे आता या मुद्दयावर कोणताही वाद निर्माण होता कामा नये.

राऊतांचा काँग्रेसवर प्रहार

काँग्रेस पक्ष अजूनही घराणेशाहीचे राजकारण करीत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षांसाठी एक सर्वमान्य नेतृत्व हवे असते, परंतु देशातील विरोधी पक्ष मात्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. काँग्रेस पक्षाने राहुल आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. परंतु मोदी सरकारने मात्र या मोर्चाला गांभीर्याने घेतले नाही यावरून विरोधी पक्षाची दुर्दशा स्पष्ट होते. देशातील विरोधी पक्ष कमजोर झालेले आहेत. सर्वच विरोधक विखुरलेले आहेत.

काँग्रेससारख्या जुन्या आणि ऐतिहासिक पक्षालासुद्धा गेल्या वर्षभरापासून पूर्णवेळ अध्यक्ष निवडता आला नाही. सोनिया गांधी युपीएच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष आहेत. त्यांच्याजवळचे काँग्रेस नेते अदृश्य झालेले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेतृत्व कोण करेल. संजय राऊत यांनी युपीएवरही जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, युपीएची परिस्थिती एकांड्या शिलेदारासारखी झालेली आहे. युपीएची अवस्था ‘एनजीओ’सारखी दिसत आहे. युपीएच्या घटक पक्षांनी शेतकरी आंदोलनाला गांभीर्याने घेतलेच नाही.