श्रीलंका भारतासोबत की, चीनच्या बाजूने

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजपक्षे यांच्या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. हेच बघायचे आहे की, श्रीलंका आता भारतासोबत राहणार आहे की, चीनच्या बाजूने झुकणार आहे? श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबया राजपक्षे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे बंधू आहे. त्यांचा एक भाऊ बासिल राजपक्षे सत्तापक्षाचे नेते आहेत. तात्पर्य असे की, श्रीलंकेची संपूर्ण सत्ता राजपक्षे परिवाराच्या ताब्यात आहे.

श्रीलंकेच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान राजपक्षे परिवाराच्या चीनसमर्थक श्रीलंका पीपल्स पक्षाने दोन तृतीयांश बहुमत मिळवून प्रचंड विजय मिळविला आहे. इ.स. १९७८ मध्ये श्रीलंकेने राष्ट्रपती शासन पद्धती स्वीकारली, त्यानंतर निवडणुकीमध्ये इतका मोठी विजय मिळविणे ही असाधारण बाब आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजपक्षे यांच्या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. हेच बघायचे आहे की, श्रीलंका आता भारतासोबत राहणार आहे की, चीनच्या बाजूने झुकणार आहे? श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबया राजपक्षे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे बंधू आहे. त्यांचा एक भाऊ बासिल राजपक्षे सत्तापक्षाचे नेते आहेत. तात्पर्य असे की, श्रीलंकेची संपूर्ण सत्ता राजपक्षे परिवाराच्या ताब्यात आहे. राजपक्षे यांच्या यशाचे गमक असे आहे की, त्यांनी राष्ट्रवादावर सर्वाधिक भर दिला असून मजबूत सरकारच जनतेचे कल्याण करु शकते, असा विचार जनतेच्या मनात ठासून भरला. राष्ट्रपतींच्या अधिकारांवर बंधने घालण्याबाबतची घटनादुरुस्ती मैत्रीपाल सिरीसेना यांनी इ.स. २०१५ मध्ये पारीत केली होती. आता राजपक्षे बंधू ही अडचण दूर करु इच्छितात. 

घटनादुरुस्ती करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे आणि श्रीलंका पीपल्स पक्षाने त्यांच्या निवडूणूक जाहिरनाम्यात हे स्पष्ट नमूद केले होते. संसदेच्या २२५ जागांपैकी १४५ जागा या पक्षाने जिंकल्या आहेत. सहकारी पक्षाच्या जागासोबत आता त्यांच्याकडे १५० जागा झालेल्या आहेत. त्यामुळे आता घटनादुरुस्ती करुन राष्ट्रपतींच्या अधिकारात वाढ करणे त्यांना शक्य झालेले आहेत. दक्षिण श्रीलंकेत सिंहली लोकांचे प्राबल्य आहेत. सत्ताधारी श्रीलंका पिपल्स पक्षाला या भागांमध्ये प्रचंड मतदान झाले आहेत. यामुले या पक्षाने सिंहली जनतेमध्ये राष्ट्रवादाची भावना तीव्र केली होती. मागील वर्षी श्रीलंकेत इस्लामी अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले होते, त्यानंतर अशा परिस्थितीत उत्तर श्रीलंकेत तामिळ अल्पसंख्यकांचे आता काय होणार? 

चीनची भयानक चाल 

भारताला हिंद महासागरात घेरण्याचा चीनचा प्रयत्न आहे. चीनने हंबनटोटा बंदराचा विकास करण्यासाठी श्रीलंकेला मोठे कर्ज दिलेले आहे. इतके कर्ज दिले की, ते कर्ज चीनला परत करणेही श्रीलंकेला अशक्य आहे. याच्या बदल्यामध्ये चीन तेथे नौसेनिकांचा तळ उभारण्याच्या तयारीत आहे. श्रीलंकेला चीन जी मदत करीत आहे. ती केवळ आर्थिक आणि व्यापारविषयक कारणामुळे नाही तर चीनची यामागे लष्करी रणनीती आहे. महिंदा राजपक्षे यांची मैत्री आता लपून राहिलेली नाही. आशा परिस्थितीत भारताची ही प्राथमिकता असायला पाहिजे की, श्रीलंकेला चीनच्या बाजूने जास्त झुकू देता कामा नये. भारताची आर्थीक स्थिती चीनसारखी नाही की, श्रीलंकेला भारत मोठी मदत करु शकेल. भारताला श्रीलंकेसोबत राजकीय, आर्थिक आणि सास्कृतिक संबंध आणखी दृढ करण्याची नितांत आवश्यकता आहे. 

भारताला संबंध चांगले ठेवावे लागेल

श्रीलंकेतील एकूणच राजकारणाबाबत भारताचा जो दृष्टिकोन असतो, त्याला विशेष महत्तव आहे. चीनचे दक्षिण आशियावर वर्चस्व वाढू लागले आहेत. त्यामुळे भारताला सतर्क राहून श्रीलंकेसोबतचे संबंध आणखी मबूत करावे लागणार आहे. मोदी सरकारला हे लक्षात घ्यावे लागेल की, नेपाळप्रमाणे श्रीलंका चीनच्या बाजूने झुकू नये. इ.स. १९८० मध्ये श्रीलंकेत लिट्टेंची समस्या होती. श्रीलंकेची तत्कालिन राष्ट्रपती जयवर्धने यांच्या विनंतीवरुन भारताने श्रीलंकेत शांती सेना पाठविली होती. त्यावेळी जयवर्धने यांनी म्हटले होते की, जर भारताने शांती सेना पाठविली नाही तर आम्ही पाकिस्तान किंवा अमेरिकेकडे सेना पाठविण्याची विनंती करु भारताचे तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेत शांती सेना पाठविली होती. परंतु त्याचा परिणाम मात्र विपरीत झाला. लिट्टे भारताचा शत्रू बनला आणि राजीव गांधी यांची मानव बॉम्बने हत्या केली. भारत आणि श्रीलंकेच्या संबंधात तणाव निर्माण झाला. अखेर श्रीलंकेच्या सैन्याने लिट्टेचा सफाया केला आणि लिट्टे नेता प्रभाकर याला ठार केले.