विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षेकडे वाटचाल

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन या पैकी एकाचा स्वीकार करावा लागेल. येथे विद्यार्थ्यांची काळजी याला महत्त्व दिले पाहीजे. परीक्षा ही कमी वेळामध्ये म्हणजे एक तासांची असेल तसेच ५० गुणांची असेल. यामध्ये २५ किंवा ५० प्रश्न असतील व हे प्रश्न काठिण्य पातळीनुसार परिक्षेसाठी माहिती येणार आहे. त्याकडे लक्ष द्यावे.

कोरोना महामारीमुळे (corona virus) इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच शिक्षणक्षेत्रही (education field) अक्षरश: ढवळून निघाले आहे. सुरूवातीला या महामारीच्या काळात ऑनलाईन अध्ययन-अध्यापन यावर (online education)  भर दिला तर परीक्षा घ्याव्यात की नको यावर वादंग निर्माण झाले आहे. खरे म्हटले तर परीक्षा ही एकूण शिक्षणव्यवस्थेचे हृदयच आहे. असे म्हणता येईल. त्यामुळे त्या कशा घ्याव्यात याविषयी विद्यार्थ्यांमध्ये (students) , शिक्षकांमध्ये (teachres)  व विदयापीठे (universities), प्रशासनामध्ये (administration) संभ्रमावस्था निर्माण झाली होती. सर्वाच्च न्यायालयाने परीक्षा घ्यायलाच पाहिजेत. असा निर्णय दिल्यानंतर त्याचा आदर राखून आता मात्र सर्वच विद्यापाठांतील प्रशासन व परीक्षा विभाग जोमाने कामाला लागले आहेत.

परीक्षा तर सुरक्षित घ्यायच्या, त्याचे पावित्र्य तर जपायचे. विद्यार्थ्यांना शारीरिक व भावनिक इजा होणार नाही, हे सर्व सांभाळून परीक्षा आयोजित करणे ही खरे तर तारेवरची करसत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन या पैकी एकाचा स्वीकार करावा लागेल. येथे विद्यार्थ्यांची काळजी याला महत्त्व दिले पाहीजे. परीक्षा ही कमी वेळामध्ये म्हणजे एक तासांची असेल तसेच ५० गुणांची असेल. यामध्ये २५ किंवा ५० प्रश्न असतील व हे प्रश्न काठिण्य पातळीनुसार परिक्षेसाठी माहिती येणार आहे. त्याकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे स्वत:चा जो मोबाईल नंबर आणि ईमेल-आयडी वापरात आहेत. तोच द्यावा महाविद्यालय किंवा विद्यापीठ या दोन माध्यमांद्वारे आपल्याशी संपर्क साधणार आहे. त्यामुळे माझा फोन नंबर बदलला, फोन बाद झाला,ई-मेल ओपन होत नाही. अशी कारणे सांगू नयेत.

फोन रिचार्ज करून ठेवावेत. इंटरनेट रेंज जिथे चांगले येते ते ठिकाण ठरवावे या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित हाताळल्या तर तुमचा अर्धा ताण कमी होईल. तसेच, विद्यार्थ्यांनी स्वत: च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पारंपारिक पद्धतीने परीक्षा देताना काही विद्यार्थ्यांना भीती वाटते, ताण येतो, तब्येत बिघडते असे प्रकार होत असतात. अशा तक्रारी उद्भवणार नाहीत यासाठी योग्य तो संवाद शिक्षकांशी साधावा. ऑफलाईन परीक्षा हा जर काही विद्यार्थ्यी पर्याय निवडत असतील तर त्यांनी स्वत: जवळ सॅनिटायझर ठेवावे, पाणी ठेवावे,खाण्याच्या वस्तू ठेवणे गरजेचे आहे.