kangana - sushant

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपने बिहार निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले. जर बिहारमध्ये भाजपला चांगले यश मिळाले तर, देवेंद्र फडणवीस यांचे प्रस्थ आणखी वाढेल. तसेच त्यांची केंद्रमध्येसुद्धा वर्णी लागण्याची शक्यता आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाद्वारे (BJP) अभिनेता सुशांतसिंग राजपूत (sushant singh rajput death) याचा संशयास्पद मृत्यू तसेच अभिनेत्री कंगना राणौत (kangana ranaut ) हिच्या कार्यालयाच्या तोडफोजीचा मुद्दा बनविण्यावरुन रणनीती आखली जात आहे. जरी ही घटना मुंबईमध्ये घडली तरीसुद्धा भाजप या बहाण्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर एकसाथ निशाणा साधत आहे. कारण याच तिन्ही पक्षांची महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आहे. सुशांतसिंग राजपूत याला बिहारचा पुत्र आणि कंगनाला हिमाचलची मुगली सांगून शिवसेना नेता आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप शरसंधान साधत आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपने बिहार निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले. जर बिहारमध्ये भाजपला चांगले यश मिळाले तर, देवेंद्र फडणवीस यांचे प्रस्थ आणखी वाढेल. तसेच त्यांची केंद्रमध्येसुद्धा वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कायदा-व्यवस्था भंग केल्याच्या नावावर राष्ट्रपती लागवट लागू करण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना नियंत्रित बीएमसीद्वारे कंगना यांचे ऑफिस तोडले आणि नैदलाचे माजी अधिकाऱ्याला सोशल मिडियावर कार्टून फॉरवर्ड केल्याने मारहाण केल्याचा मुद्दा जोर धरत आहे.

देवेंद्र फडणवीस आणि जयरम ठाकूर यांचे समर्थन

ज्यावेळी कंगनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वाय प्लस सुरक्षा प्रदान केली तेव्हा स्पष्ट झाले की, भाजपा तिची संरक्षक म्हणून पुढे आली आहे. कंगनाप्रकरणी केंद्रीय नेते संयमित विधान करणार आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्चा सांभाळणार अशी भाजपची रणनीती दिसून येत आहे. भाजप प्रवक्तेसुद्धा टीव्ही चॅनलवर शिवसेनेला घेरण्याचे काम करीत आहे. त्यांनी युक्तिवाद केला. तर मग कंगनाचे कार्यालय एकाएकी का पाडण्यात आले? हे मुद्दे चर्चेत आले असून भाजप बिहारच्या जनतेला भुरळ घालण्याची शक्यता आहे. खासकरुन सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांची शिथिल भूमिका, नंतर सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी केलेली मागणी आणि नितीशकुमारांच्या शिफारशीनुसार सीबीआय तसेच अन्य केंद्रीय संस्थांद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु झाल्याचे मोठा फरक पडला आहे. त्यामुळे तपासात ड्रग्ज माफियांबाबत खुलासे होत आहेत. शिवसेना नेते संजय राऊतद्वारे कंगनाला हरामखोर म्हटल्यावरुनही प्रतिक्रिया देण्यात आल्या. एकूणच बिहार निवडणुकीत या सर्व बाबी महत्त्वपूर्ण ठरण्याची चिन्हे आहेत.

बंगाल निवडणुकीत विरोधक भाजपला घेरणार

बंगाल विधानसभा निवडणूक काही महिन्यानंतर होणार आहे. यात रिया चक्रवर्तीला बंगाली ब्राम्हण कन्या सांगून विरोधी पक्ष भाजपला नक्कीच घेरणार. रिया चक्रवर्तीचे वडील बंगाली ब्राम्हण आणि आई मह्राराष्ट्रीय आहे. जिथवर ड्रग्ज घेण्याचा प्रश्न उपस्थित होतो बॉलिवूडला हे होतेच. रियाजवळ ड्रग्ज आढळून आलेले नाही. तसे झाले तर तपास यंत्रणेकडे ठोस पुरावा असता. समाजमाध्यमांमध्ये जरी चर्चा झाल्या तरी न्यायालयात पुरावा महत्त्वाचा आहे. सध्यातरी सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू,रिया चक्रवर्ती आणि कंगना प्रकरण निवडणुकीचे राजकारणाला वळण देत आहे. क्षेत्रीय भावनांमुळे बिहार आर बंगाल येथील निवडणुकीच्या मुद्यावर परिणाम करणार, हे नक्की. तसे कंगनाही बोलण्यात कमी नाही. तिच्या उलटसुलट विधानांमध्ये कोण आहे, हे सुद्दा समजून येते.