narendra modi

चीन-भारत सीमेवर चिनी सैनिक भारतीय सेनेने पिटाळून लावलेले आहे. तथापि, चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगही म्हणतात की, चीन आपला एक इंच जमीनी सोडणार नाही. उल्टा चोर कोतवाल को डाटे असेच काहीसे चीनचे धोरण आहे.

चीनचा मूर्खपणा संपूर्ण जगाला ठाऊक आहे. चीनने भारतावर इ.स. १९६२ मध्ये हल्ला करुन भारताच्या २२००० चौरस मैल जमिनीवर अवैध कब्जा केलेला आहे. त्यापूर्वी चीनने तिबेटवर स्वारी करुन कब्जा केलेला आहे. त्यापूर्वी चीनने तिबेटवर स्वारी करुन तिबेटचा बराच भूभाग ताब्यात घेतलेला आहे. चीन विस्तारवादी देश आहे. चीनची मानसिकता चोर-डाकूप्रमाणे आहे. शेजारी देशाच्या सार्वभौमत्वाचा चीन मुळीच सन्मान करीत नाही. चीन कुटिल देश आहे. अमेरिकेलाही मागे सोडून जगातील महाशक्ती बनण्याचे स्वप्न चीन पाहात आहे. चीनने कोरोना व्हायरस संपूर्ण जगात पसरविला आहे. या कोरोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. कोरोनाच्या काळात जगातील सर्व देशांचा जीडीपी घसरलेला आङे. परंतु चीनच्या जीडीपीत मात्र 3.2 टक्क्यांनी वाढलेला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्स ने दावा केलेला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सध्या दबावात आहे. हे वास्तव नसून मोदी यांच्यासोबत संपूर्ण भारतीय जनता उभी आहे.

चीन-भारत सीमेवर चिनी सैनिक भारतीय सेनेने पिटाळून लावलेले आहे. तथापि, चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगही म्हणतात की, चीन आपला एक इंच जमीनी सोडणार नाही. उल्टा चोर कोतवाल को डाटे असेच काहीसे चीनचे धोरण आहे. चीन त्यांच्या शेजारी देशाच्या भूभाग हडप करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. चीनने जपानचे बेट हडप केले तसेच दक्षिण चीन महासागरात त्यांच्या सैनिकांचा बेडा उभा केला. व्हिएतनाम ऑस्ट्रेलिया म्यानमार हे देश चिनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे चीनवर प्रचंड नाराज आहेत.

मॉस्को येथे नुकत्याच पार पडलेल्या शांघाई सह्योग संघटनेच्या मंत्रीस्तरीय बैठकीत भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ यांनी चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगही यांना समज दिली आहे. कोणत्याही देशावर आक्रमण केल्यामुळे उभय देशांचा विनाश होत असतो, हे चीनने लक्षात घेतले पाहिजे शेजारी देशांसोबत जर काही मुद्यावर मतभेद असतील तर ते चर्चेतून सोडविता येऊ शकतात. आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधीन राहून त्यावर शांततापूर्वक तोडगा निघू शकतो. अशी भारताची भूमिका आहे. भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या संदर्भात चीनचे विदेशमंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चा केली आहे. भारताचे विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्हटले आहे की, भारताचे सार्वभौमत्व आणि क्षेत्रिय अखंडतेबाबत भारत कुठलाही समझोता करणार नाही. संरक्षणमंत्री आणि विदेशमंत्री स्तरीय चर्चेनंतर आता पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या दरम्यान चर्चा होणार आहे.

भारताच्या शक्तीची चीनला जाणीव आहे

चीनने जेव्हा लडाखमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारतीय सैन्याने चिनी सैनिकांना ज्या पद्धतीने हाकलून लावले. त्यावरुन भारताच्या सैनिक शक्तीची जाणीव झालेली आहे. आता इ.स १९६२ चा भारत राहिलेला नाही. आता आम्हीही शत्रूंचा तेवढ्याच ताकदीनिशी सामना करण्यास सक्षम आहोत. आमची सेना केवळ लडाखमध्येच नाही तर पूर्वोत्तरच्या सर्व सीमाभागात तैनात आहे. सेनाप्रमुख जनरल नरवणे यांनी लडाखचा दौरा करुन भारतीय सैनिकांची हिंमत वाढविली आहे. भारताकडे आधुनिक शस्त्रास्त्रे, टँक आणि मिसाईल आहेत. चीनचा मुकाबला करण्यासाठी भारतीय सैन्य आता सज्ज आहेत. आमचे सैन्य वायुसेना आणि नौसेनेमध्ये सुंदर ताळमेळ आहे. अमेरिकासुद्धा भारताच्या बाजूने आहे. जनरल बिपीन रावत यांनी अशी शंका व्यक्त केली आहे की, चीनसोबत जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तानसुद्धा यामध्ये उतरु शकतो, त्यामुळे भारताने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगितले आहे. की, पाकने असे दुःसाहस करु नये. संरक्षणमंत्री राजनाथसिंह रशियावरुन परतत असताना इराणमध्ये थांबले आणि त्यांनी इराणच्या नेत्यांना चीनपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. भारत आणि इराणमध्ये फास पूर्वीपासून मैत्री आहे. ही मैत्री लक्षात घेऊन इराणने चीन आणि पाकिस्तानला सहकार्य करु नये, असा राजनाथ सिंह यांनी दिला आहे.