जीडीपीत ४० वर्षात सर्वात मोठी पडझड, देशाची आर्थव्यवस्था कोमात

देशाची अर्थव्यवस्थाच (economy )कोरोना समान झाली आहे. आवरण्यासह सावरण्याचे प्रयत्न फेल ठरत आहेत. गेल्या ४० वर्षातील सर्वात मोठ्या पडझडीचा तडाखा काल-परवा सहन करावा लागला. (The biggest drop in GDP in 40 years) उसळलेल्या घोड्यासमान स्थिती झाली आहे. २३.९ टक्के पडझड म्हणजे देश गुदमरण्याच्या स्थितीत दाखल झाला आहे. सरकारचे ऑक्सिजनचे तमाम दावे फेल ठरले आहेत. महामारीच्या तडाख्याने आर्थिक वर्ष २०२० मध्ये ११ एप्रिल ते जूनपर्यंतच्या प्रथम तिमाहित मोठ्या प्रमाणात पडझड दिसली. लॉकडाऊनमुळे विनिर्माण (मॅन्यूफॅक्चरिंग), व्यापार, हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट, संचार आदी क्षेत्राची स्थिती भयावह दिलसी. सर्वच ठप्प पडल्यागत झाल्यामुळे अर्थव्यवस्थेत त्राण उरले नाही.

कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था पाप्याचे पितर झाले असा मुळीच भाग नाही. नोटबंदी, जीएसटीसारख्या चुकीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचा पाया खिळखिळा झाला. कुठल्याही एखाद्या धक्क्याने डोलारा पडणारच होता. ते काम मग कोरोनाने केले. नोटबंदीमुळे काळेधन बाहेर आले नाही. पण, लहान-सहान उद्योग मात्र चौपट झाले. बेरोजगारी महामारीसारखी पसरली. दरम्यान जीएसटी लागू झाल्यामुळे व्यापाऱ्याच्या अडचणी वाढल्यात. कृषिक्षेत्र सोडले तर तमाम क्षेत्रांच्या गतीवर व्यापक परिणाम झाला. गतिमान व्यापर कासवछाप चालीवर स्थिरावला. टक्केवारीत कथन करायचे झाल्यास २७ टक्क्याच्या आसपास ती बाधित झाली. सरकार १९९६-९७ पासून प्रत्येक तिमाहीत ग्रोथ (विकास) अनुमान सादर करीत आले. तेव्हापासून प्रथमच एवढी व्यापक पडझड दिसली. सरकारचे अनुमान कार्पोरेट सेक्टरच्या डेटावर अवलंबून आहे. यात अनौपचारिक अर्थव्यवस्थेचा समुचित समावेश नाही.

कृषिक्षेत्र शानदार

शेतीसह त्यावर अवलंबून असलेल्या व्यापर व्यवसायावर लॉकडाऊनचा फारसा असर पडला नाही. रब्बी पिकांमुळे यात ३.४ टक्क्याची वाढ दिसली. आता मान्सूनची अनुकूलता व पेरणीनंतर हे क्षेत्र समाधानकारक वाटत आहे. सेवा क्षेत्रातील विमानसेवा, हॉस्पिलिटी आदींचा तर बँड वाजला. सार्वजनिक उपयोगाचे प्रमाण २५ टक्के स्थिरावले कन्स्ट्रक्शन क्षेत्र ५.३ टक्क्यावर आले.

उत्पन्नावर प्रश्नचिन्ह

लोकांना उत्पन्न व नोकरीबाबत अनिश्चितता होती व आहे. कर्मचारी व वेतनकपातीचा घरखर्चावर परिणाम झाला. लोकं केवळ खाण्या-पिण्याच्या व आवश्यक बाबींवर खर्च करीत आहेत. गुंतवणुकीवर परिणाम झाला. पडझडीचे मोजमाप केले तर ४७.१ टकक्यावर ती विसावली.

७ कोअर सेक्टरमध्ये पडझड

लोखंड, रिफायनरी, सिमेंट, प्राकृतिक गॅस, कोळसा. कच्चे तेल व विजेसारख्या लोअर उत्पादनाची ९.६ पडझड झाली. केवळ खतांचे उत्पादन १.५ टक्क्याने वाढले. कोर सेक्टरची मंदी स्पष्ट करीत आहे. की कोरोना संकटाचा अर्थव्यवस्थेला फार मोठा तडाखा बसला. तब्बल ५ व्यांदा कोर सेक्टर आकुंचित पावले. महसुलाचे न भतो न भविष्यती नुकसान झाले. ४ महिन्यात अर्थव्यवस्थेचे अनुमान ८.२ लाख कोटी किंवा १०३ टक्केपर्यंत आघात झेलू शकले.