प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

ख्रिस लार्सेन आणि जेट मॅकलेबच्या इंटरनेट ऑफ व्हॅल्यूच्या सिद्धांताप्रमाणे, जगामध्ये मालमत्तांचे हस्तांतरण ही अशी गोष्ट आहे जी आधीच सुरू झालेली आहे. मात्र सोर्स एकडून सोर्स बीकडे जाणाऱ्या पैशांचे मूल्य संक्रमणादरम्यान कमी होते. का? व्यवहार शुल्क, अविश्वासार्ह नेटवर्क, मालमत्तेची मंदगतीने हालचाल आणि त्रुटीचे मार्जिन. क्रिप्टो या समस्या सोडवतो. ब्लॉकचेनच्या अंगभूत गुणधर्मामुळे, नेटवर्कची सुरक्षा स्थिर असते आणि मालमत्तांची हालचाल तात्काळ आणि शोधण्यायोग्य असते.

    निश्चल शेट्टी

    वेब ३ (Web 3) ही संज्ञा क्रिप्टो (Crypto) आधारित व्हॅल्यू एक्सचेंज मॉडेलच्या (Value Exchange Model) आधारावर आजच्या केंद्रित नेटवर्ककडून विकेंद्रित नेटवर्ककडे होणाऱ्या संक्रमणाचे वर्णन करते. ही झपाट्याने विकसित होणारी प्रणाली आहे, जिथे ब्लॉकचेन तंत्रज्ञान फायनान्शिअल ॲप्लिकेशन्सचा (Blockchain Technology Financial Applications) पाया तयार करते. आता क्रिप्टो जगभरात लोकप्रिय कसे झाले त्याकडे पाहता-जागतिक वित्तीय मार्केट्स कोसळताना उघडपणे दिसले त्याप्रमाणे पारंपरिक वित्तीय प्रणाली गुंफलेली आहे.

    याची परिणिती लोकांचा व्यवस्थेवरील आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या सुरक्षेवरील विश्वास कमी होण्यात झाली. त्यामुळे जेव्हा जुन्या व्यवस्थेच्या मर्यादांपासून मुक्त असलेल्या क्रिप्टोच्या स्वरूपात पर्याय सुचवण्यात आला, तेव्हा लोकांनी त्यामध्ये प्रयोग करायला सुरुवात केली. आणि का नाही? ही नवीन व्यवस्था तुमच्या पैशांच्या व्यवस्थापनामध्ये तिसऱ्या पक्षाने सहभागी होण्याची गरज दूर करते आणि संपूर्ण पारदर्शकतेचे वचन देते.

    आता थेट २०२२ कडे येऊया, क्रिप्टो मार्केटच्या आकारमानाने ३ ट्रिलियन डॉलरचे शिखर गाठले आहे. ते २०२१ पासून २०३० पर्यंत १२.८% च्या सीएजीआरने वाढण्याची अपेक्षा आहे. व्यवहार, गुंतवणूक आणि मालमत्ता व्यवस्थापनाच्या केंद्रित प्रणालींचे विकेंद्रित स्वरुपाकडे होणारे स्थलांतर विकसनशील देशांच्या आर्थिक वाढीचे वचन देते आणि त्याच्यामध्ये पारंपरिक बँकिंग प्रणालीचा ॲक्सेस नसलेल्या समुदायांचे सबलीकरण करण्याची क्षमता आहे. त्याच्या जोडीला कोणत्याही त्रुटींविना व्यवहार, पैसे पाठवण्यासाठी फारसे शुल्क नसणे आणि टोकन म्हणून विनिमयाची सुलभता यामुळे पारंपरिक बँकिंग प्रणालीचा (TradFi) फारसा लाभ न झालेल्या समुदायांना यासाठी फारसे बौद्धिक किंवा मानसिक कष्ट घ्यावे लागत नाहीत. क्रिप्टोच्या नेतृत्वाखालील वेब३ अर्थव्यवस्था विकेंद्रित पीअर-टू-पीअर प्रणालीला प्रोत्साहन देणाऱ्या व्हायब्रंट मॉडेल्स तयार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते. गेम थेअरीप्रमाणेच, समुदायाचे सदस्य स्वतंत्रपणे निर्णय घेतात आणि नेटवर्कमध्ये योगदान दिल्याबद्दल आणि ते सुरक्षित केल्याबद्दल त्यांना प्रोत्साहन मिळते.

    ख्रिस लार्सेन आणि जेट मॅकलेबच्या इंटरनेट ऑफ व्हॅल्यूच्या सिद्धांताप्रमाणे, जगामध्ये मालमत्तांचे हस्तांतरण ही अशी गोष्ट आहे जी आधीच सुरू झालेली आहे. मात्र सोर्स एकडून सोर्स बीकडे जाणाऱ्या पैशांचे मूल्य संक्रमणादरम्यान कमी होते. का? व्यवहार शुल्क, अविश्वासार्ह नेटवर्क, मालमत्तेची मंदगतीने हालचाल आणि त्रुटीचे मार्जिन. क्रिप्टो या समस्या सोडवतो. ब्लॉकचेनच्या अंगभूत गुणधर्मामुळे, नेटवर्कची सुरक्षा स्थिर असते आणि मालमत्तांची हालचाल तात्काळ आणि शोधण्यायोग्य असते. त्यामुळे मूल्याची मूळची संपत्ती न गमावता त्याचे एका सोर्सकडून दुसऱ्या सोर्सकडे सहज हस्तांतरण होते. तो पैसा असू शकतो, कलावस्तू, नवीन म्युझिक अल्बम, नवीन बिझनेस मॉडेल्सचे व्हाइटपेपर किंवा समुदायाला मौल्यवान वाटेल असे काहीही असू शकते. हे क्रिएटर अर्थव्यवस्थेस उदयास आणते.

    पारंपरिक वित्तीय प्रणाली ऐतिहासिकदृष्ट्या संथ, अस्थिर, अविश्वासार्ह आणि खर्चिक राहिली आहे. यामुळे डिजिटल उपकरणांचा ॲक्सेस असलेल्या पण आतापर्यंत कमी सेवा मिळालेल्या विविध समुदायांसाठी दरवाजे सताड उघडतात. जागतिक बँक ग्रुपनुसार, २०१७ मध्ये प्रौढ लोकसंख्येपैकी ३१% लोकसंख्येपर्यंत बँक पोहोचली नव्हती. मॅकेन्झीच्या २०१६ च्या एका अहवालात असे भाकित करण्यात आले होते की मोबाईल फोन, इंटरनेट किंवा कार्डांद्वारे वितरित केल्या जाणाऱ्या वित्तीय सेवांमुळे सर्व उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या वार्षिक जीडीपीमध्ये ३.७ ट्रिलियन डॉलरने वाढ होण्याचा अंदाज आहे.

    पीडब्ल्यूसीने २०२० मध्ये केलेले विश्लेषण असे दाखवते की पुढील दशकभरात जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनात १.७६ ट्रिलियन यूएस डॉलरने वाढ करण्याची ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची क्षमता आहे. जर तुम्ही ही दोन्ही भाकिते एकत्र केली तर तुम्हाला याची जाणीव होईल की यामध्ये क्रिप्टो हा समान घटक आहे आणि तो अनेक वर्षांपासून असलेल्या ॲक्सेसमधील अंतर भरून काढण्यासाठी पूलाची भूमिका बजावू शकतो. क्रिप्टो समुदाय वापरत असलेली ‘विकेंद्रित प्रणाली’ काही मोजक्या मध्यस्थांचा लाभ करून देण्याऐवजी रांगेतील शेवटचे वापरकर्ते आणि लाभार्थी यांना लाभ मिळवून देण्याचेही आश्वासन देते.

    आज अब्जावधी व्यक्तींना क्रिप्टोमुळे संपत्तीपर्यंत पोहोचता येते आणि त्या वेब३चे समर्थन असलेल्या इन्सेंटिव्ह मेकॅनिझमच्या माध्यमातून पैसे कमावत आहेत. आया त्यांच्या मुलांसाठी आंतरपिढी संपत्ती निर्मिती करण्यासाठी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत आहेत. कौटुंबिक क्रिप्टो वॉलेट्स उदयाला येत आहेत, जे मुलांना क्रिप्टो शिक्षणासाटी संसाधने प्रदान करतात आणि कुटुंबांना गुंतवणूक म्हणून डिजिटल मालमत्तांमध्ये गुंतवणूक करू देतात. एनएफटीमध्ये कलाकारांना त्यांच्या कमाईचा बराच मोठा हिस्सा स्वतःकडे राखण्यास समर्थ करून स्वतःचे आयुष्य बदलण्याची क्षमता आहे.

    २०२० मध्ये २० अब्ज डॉलरपेक्षा अधिक महसूलाची कमाई करणारा प्ले टू अर्न (कमावण्यासाठी खेळा) हा गेमिंग उद्योग हे आणखी एक उत्तम उदाहरण आहे. आज क्रिप्टो व्यवहारांचे जवळपास ५०% व्यवहार गेमिंगशी संबंधित आहेत. प्ले टू अर्न (कमावण्यासाठी खेळा) गेम्स प्लेयर्सना डिजिटल मालमत्ता कमावण्याची आणि त्याची मालकी मिळवण्याची संधी देतात ज्यांचा उपयोग गेमच्या बाहेरही करता येतो. फिलिपाईन्स आणि व्हेनेझुएलासारख्या देशांनी पी२ई गेमिंगला सुरुवात झाल्यापासून गेमर्सच्या संख्येमध्ये वाढ झालेली पाहिली आहे. ते गेम्सच्या माध्यमातून कमाई करत असलेल्या प्रोत्साहनांचे मूल्य त्यांच्या स्थानिक चलनापेक्षा किंवा एरवी त्यांना कमावता आले असते त्या पैशांपेक्षा जास्त आहे. आता वेब३ युगामध्ये स्वतः निर्णय घेत असलेल्या समुदायाला अधिकार दिले जात असल्यामुळे जुन्या मालकी हक्काच्या मॉडेल्समध्ये व्यत्यय येत आहे.

    क्रिप्टो मुख्य प्रवाहात येत असल्याबद्दल जगभरातील नियामक कशा प्रकारे द्विधा मनस्थितीत आहेत ते पाहता, काही मुद्दे उपस्थित करणे महत्त्वाचे आहे. क्रिप्टोचा जनसामान्यांनी स्वीकार करण्यासाठी कोअर ब्लॉकचेन प्रणालीची रचना मजबूत आणि अमर्यादपणे वाढवता येणे आवश्यक आहे. एकाच वेळी अब्जावधी लोकांनी व्यवहार केल्यास प्रणालीची कामगिरी खालावणार नाही याची सुनिश्चिती करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असेल.

    बँकेसारख्या मध्यस्थांच्या गैरहजेरीत मार्केटमधील चढउतार स्थिर होण्यासाठी एखादी यंत्रणा असणे आवश्यक आहे. जर स्टेबलकॉइन क्रॅश होऊन सर्व गुंतवणूक बुडण्याची परिस्थिती उद्भवली तर, नेटवर्क इंटरऑपरेबिलिटीचा पर्याय वापरात आणला पाहिजे, जिथे मालमत्ता एका स्वतंत्र नेटवर्कवर हस्तांतरित करता येतील. यामुळे गुंतवणूकदाराच्या हितसंबंधांचे संरक्षण होईल आणि तसेच प्रणालीवरील विश्वासही मोठ्या प्रमाणात वाढेल. एक गुंतवणूक म्हणून क्रिप्टो जागतिक पातळीवर बँकांद्वारे एकीकृत करणे आवश्यक आहे. आपण पाहिले आहे की शंकेचा कालावधी संपल्यानंतर वॉल स्ट्रीटच्या सर्व प्रमुख बँकांनी क्रिप्टोचा स्वीकार केला आहे. जगभरातील खासगी बँकांनी याचे अनुकरण करण्याची आणि मालमत्ता वर्ग म्हणून क्रिप्टोच्या क्षमतेला मान्यता देण्याची वेळ आली आहे.

    नियामक दृष्टिकोनातून, आपल्याला गुंतवणूकदारांना रोखण्याऐवजी त्यांना क्रिप्टोमधील मूल्य पाहण्यास परवानगी देणाऱ्या आणखी धोरणांची गरज आहे. क्रिप्टो क्रांतीमध्ये आघाडीवर असणाऱ्या बहुसंख्य देशांनी गुंतवणूकदार स्नेही धोरणे आणली आहेत. उदाहरणार्थ जर्मनीने १ वर्षानंतर क्रिप्टो मालमत्तेतून मिळणारा नफा करमुक्त केला आहे. रियो दि जानेरोमध्ये, क्रिप्टोचा वापर करून स्थावर मिळकतीवरील कर भरता येऊ शकतो. युएई आणि सिंगापूरदेखील अधिक शिथिल नियमनांनी क्रिप्टो घडामोडींची प्रमुख केंद्रे होत आहेत. त्याचप्रकारे, क्रिप्टोचा मुद्दा येतो तेव्हा जोखीम व्यवस्थापनाभोवती चौकट प्रस्थापित करण्याची गरज आहे. सीबीडीसी गुंतवणूकदारांना स्वायत्तता कशी प्रदान करेल आणि त्यांची ओळख कशी संरक्षित करेल याच्या जोडीलाच ते सुरू करणे, वित्तीय प्रणालीमध्ये त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल, आणि स्टेबलकॉइन्सबरोबर त्याचे सह-अस्तित्त्व यामध्ये अधिक स्पष्टतेची गरज आहे. आपण यापूर्वीच जागतिक अर्थव्यवस्थेला लाभ पोहोचवणाऱ्या डिसेंट्रलाईझ्ड फायनान्सच्या अनेक युझ केसेस प्रस्थापित केल्या आहेत. आता आपल्याला केवळ ते आर्थिक वाढीचे बूस्टर होण्यासाठी जोखीम टाळण्याची यंत्रणा आणि रोडमॅपबरोबर ते पद्धतीशीरपणे कसे स्वीकारता येईल याबद्दल स्पष्टतेची गरज आहे.

    (लेखक : सह-संस्थापक आणि सीईओ, वझीरएक्स येथे कार्यरत आहेत.)