शेतकऱ्याचे अर्थकारण पाण्यात

सप्टेंबर अखेरपासून पावसाने एका मागोमाग एक दणके दिल्याने ओल्या दुष्काळात शेती आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण बुडून गेले आहे. सौराष्ट्र रायलसीमामध्ये अतिवृष्टी तर तामिळनाडू, आंध्र किनारपट्टी, तेलंगणा, बिहार, उत्तर व दक्षिण महाराष्ट्र, 'कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात अतिरिक्तष 'पाऊस झालेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ासह अन्य विभागात ऑक्टोबर मध्येही पावसाचे तांडव सुरू राहिले.

पावसाने (Rain) ताण दिला, तर त्याअभावी पिके करपून जाण्याची भीती असते. परिणामी दुबार, तिबार पेरण्या कराव्या लागतात. तेही हातचे गेले, तर दुष्काळाला सामोरे जावे लागते. तर अतिवृष्टी वा ढगफुटीसदृश ‘पाऊस झाल्यास हातचे पीक वाया जाते. यावर्षी सप्टेंबरपर्यंतचा विचार केल्यास पावसाने चांगली साथ दिली. किंबहुना, सप्टेंबर अखेरपासून पावसाने एका मागोमाग एक दणके दिल्याने ओल्या दुष्काळात शेती आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण (The Farmer’s Economy)  बुडून गेले आहे. सौराष्ट्र रायलसीमामध्ये अतिवृष्टी तर तामिळनाडू, आंध्र किनारपट्टी, तेलंगणा, बिहार, उत्तर व दक्षिण महाराष्ट्र, ‘कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात अतिरिक्तष ‘पाऊस झालेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ासह अन्य विभागात ऑक्टोबर मध्येही पावसाचे तांडव सुरू राहिले.

कमी दाबाचा पट्टा व नंतरची माघारी यातूनच ही स्थिती उद्धभवल्याचे दिसून येते. तसा या मोसमात शेतकरी बऱ्यापैकी निश्चिंत होता. दमदार पावसाने सुगीचे दिवस येतील, अशी आस त्याला होती. परंतु, एका तडाख्यात सोयाबिन, कापूस, कडधान्ये, कांदा, ऊस, मका, बाजरी यासह अनेक फळपिके उद्धवस्त झाल्याने शेतकऱयाचे दुखणे कायम अर्ध्या अधिक महाराष्ट्रातून परत फिरल्यानंतर दोन दिवसात नैत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशातून माघारी फिरण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पावसाचा हंगाम संपण्याच्या बेतात दिसतो. यंदा सर्वदूर भरभरून माप टाकणाऱ्या पावसाच्या उत्तरार्धातील तडाख्याने पुढचे सारे गणित बिघडलेले पहायला मिळते.

देशातील ६५ टक्के लोकसंस्या आजही शेतीवरच अवलंबून आहे. या शेतीचे भरपोषण पावसाचे प्रमाण कसे राहते, हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. राहिले. शेती हा किती अविश्वसनीय आणि जोखमीचा धंदा आहे, हेच यावरून अधोरेखित होते. बरे इतके सारे झाल्यावरही महाराष्ट्रासारख्या राज्यात मदत व पुनर्वसन खात्याचा कारभार ढिम्मच राहिला. त्यात महसूल खात्याने चुकीच्या नियमांच्या चौकटी आखण्यातच वेळ घालवला. त्यामुळे शेतकऱ्यांची आणखी कुचंबणा झाली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले खरे. तथापि, ते शेतकऱ्यांपर्यंत कधी ‘पोहोचणार, त्यातून त्यांचे अश्रू पुसळे जाणार का, हा. प्रश्नहच आहे. हे पॅकेज अपुरे असल्याचा मुद्दा भाजपा नेत्या पंकजा मुंडेंसह अनेकांनी उपस्थित केला आहे. तर छत्रपती संभाजीराजे यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

आजची राज्यातील स्थिती बघता ती योग्यच. म्हणूनच शेतकऱयांबद्दल संवेदनशील असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सर्व त्रुटी व ‘लालफितीचा कारभार टाळून तातडीची मदत देऊन बळीराजाला पुन्हा कसे उभे करता येईल, या दृष्टीने पावले उचलावीत. केंद्रानेही या वक््तााला साथ द्यावी. पावसाने बडवल्यानंतर सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग असलेल्या कांद्यानेही रडवायला सुरुवात केली आहे. अतिवृष्टीने लागलेली वासलात, वाढती मागणी, साठेबाजी अशा विविध कारणांमुळे अगदी महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत सगळीकडे कांद्याचे दर प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत भडकल्याचे मागच्या काही दिवसात पहायळा मिळाले. आता केंद्राने साठवणुकीवर निर्बंध घातल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेले दिसतात. कांदा निर्यातबंदीचा निर्णय आधीच सरकारने घेतला आहे.