काँग्रेसमध्ये पिढ्यांचा संघर्ष, युवा दाखवित आहेत वयोवृद्धांना आरसा

  • युवकांचा जोश जास्त दाबून ठेवता येणार नाही. चेंडू जोराने जमिनीवर आदळला तर तो त्याच वेगाने वर उसळतो हा सायन्सचा नियम आहे. अॅक्शन-रिअॅक्शन हे फोर्सेस आहेत. जुन्या जाणत्या काँग्रेसी नेत्यांची हा भाग कुठेतरी समजून घ्यावा. काँग्रेसची देशांतर्गत स्थिती गंभीर आहे. पक्ष सांभाळणे कठीण ठरत असल्यामुळे जुन्यांनी नव्यांच्या हाती कारभार देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहावे.

राजकारण म्हटले तर त्यात सर्वच वादी आहेत. परंपरावादी, रुढीवादी, पुराणमतवादी अशी एक वादी मंडळीची साखळीच बांधता येईल. काँग्रेसमध्ये पिढ्यांचा संघर्ष आपण दररोज अनुभवतो. जुन्या पिढीची मंडळी आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी नव्यांना जास्त भाव देत नाही. नवा व युवा गडी कितीही शार्प असो की शार्क त्याला पक्षासाठी आधी घाम गाळण्याचा सल्ला वयोवृद्ध काँग्रेस नेते देत राहतात. युवा नेतृत्तवाला त्यांचे डोज सहन होत नाहीत. ते जुन्या-जाणत्या नेत्यांना म्हणतात की कृपया हे डोज आम्हाला पाजू नका. आम्ही लहानपणीच पोलिओ डोज घेतल्यामुळे सशक्त आहोत. तो आम्हाला होणार नाही. याउलट तो तुम्ही लहान असताना न घेतल्यामुळे लुळे-पांगळे होण्याची भीतीत तुम्हाला आहे. 

युवकांचा जोश जास्त दाबून ठेवता येणार नाही. चेंडू जोराने जमिनीवर आदळला तर तो त्याच वेगाने वर उसळतो हा सायन्सचा नियम आहे. अॅक्शन-रिअॅक्शन हे फोर्सेस आहेत. जुन्या जाणत्या काँग्रेसी नेत्यांची हा भाग कुठेतरी समजून घ्यावा. काँग्रेसची देशांतर्गत स्थिती गंभीर आहे. पक्ष सांभाळणे कठीण ठरत असल्यामुळे जुन्यांनी नव्यांच्या हाती कारभार देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहावे. असे मात्र म्हातारे कोतारे काँग्रेसी नेते तरीत नाही. लोकसभा निवडणुकीत लज्जास्पद पराभवानंतर तणाव थोडाफार दूर होत नाही. तोच मध्यप्रदेशची सत्ता हातची निसटली. तसेच राजस्थानही संकटाच्या काठावर उभे झाले. गहलोत यांच्या सोबत बिनसल्यामुळे सचिन पायलट पक्षापासून चार हात दूर गेले आहेत. यातून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलविलेल्या व्हर्च्युअल बैठकीत गरमागरमी होणे स्वाभाविक आहे. आता काँग्रेसमध्ये एक स्पष्ट आहे. वयोवृद्ध नेत्यांचा न मागितलेले सल्ला नव्या उभरत्यांना मान्यच नाही. त्यांच्या कुटील कारस्थानांना ते पक्षांतर्गत मोडीत काढतील हे पक्के. 

पराभवासाठी युपीए जबाबदार 

या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी म्हणाले की, २०१४ च्या पराभवासाठी युपीए सरकार जबाबदार होते कां? २०१९ च्या निवडणुकीवरही मंथन होणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले. आम्हाला सरकारमधून बाहेर फेकायला ६ वर्ष झालेत युपीए वर कुणी बोट दाखिले नाही. युपीएवर सुद्धा उपस्थित व्हायला पाहिजेत. 

कपिल सिब्बलवर राजीव सातवांचा हल्ला 

माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसच्या पराभवावर भाष्य करताना म्हटले आहे की, आता आत्मावलोकन करण्याची गरज आहे. यावर राहूल गांधी यांचे निकटवर्तीय व राज्यसभेसाठी निवडून आलेले सदस्य ४६ वर्षीय राजीव सातव म्हणाले की, आत्मनिरिक्षण घरुनच व्हायला हवे. तशाच सुरुवातीची काँग्रेसला गरज आहे. आत्मपरिक्षण प्रत्येक प्रकारचे जरुर करा पण ४४ वर कसे आले हे आधी तपासून घ्या. २००९ च्या पूर्वी २०० पार होते. सर्वात आधी आत्मपरीक्षण २००९ ते २००१४ पर्यंत झाले पाहिजे. आपण सारेच तेव्हा मंत्री होते. सर्वात आझी तपासले पाहिजे की आपण कुठे कुठे असफल ठरलोत. युपीए-२ च्या कालखंडात काय लोचे झाले यावर चिंतर केल्या गेले पाहिजे. जुन्या व नव्या नेत्यांमधील स्पष्टता राजीव सातव यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाली. 

राजीव सातव गुजरातचे काँग्रेस प्रभारी आहेत. ते काँग्रेस कार्यसमितीचे स्थायी आमंत्रित आहेत. त्यांनी सर्वच मोठ्या नेत्यांसमोर आपले विचार मांडलेत. माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी सुद्धा पक्षातून लोकांचा भ्रमनिरास झाल्याचे स्पष्ट केले. कारणांची माहिती घेण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. पक्ष जिल्हा व स्थानीय पातळीवर जीर्ण झाल्याचे ते म्हणाले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, एके अॅन्टोनी, गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम, कपिल सिब्बल व आनंद शर्मा यावेळी उपस्थित होते. वयोवृद्द नेत्यांनी काँग्रेसच्या रणनितीवर पुनर्विचार करण्याचे मत व्यक्त केले. मोदी सराकर कोरोना महामारी, अर्थव्यवस्था व चीन घुसखोरी मुद्द्यांवर विफल ठरली तरी भाजप लोकप्रिय ठरतो व जनता काँग्रेसवाल्यांना उंबरठ्यावर उभे करण्यास तयार नाही. 

राहूल यांना अध्यक्ष करण्याची मागणी 

बैठकीत खासदार पीएल मुनिया, आसाम काँग्रेसचे अध्यक्ष रिपून व्होरा, शक्तिसिंह गोहिल, नीरज डांगी व छाया वर्मा यांनी राहूल यांना काँग्रेसाध्यक्ष करण्याची मागणी रेटली. यापूर्वीही काँग्रेस महासमितीच्या बैठकीत तसेच सोनियांच्या लोकसभा खासदारांच्या बैठकीतही राहूल यांना काँग्रेसाध्यक्ष करण्याची मागणी करण्यात आली होती.