सत्तापालटचा चीनमध्ये धोका, शी-जिनपिंग यांचे दिवस भरले?

वरवर पाहता वटते की, चीनी कम्युनिस्ट पार्टी स्थिर आहे. परंतु असे नाही. जिनपिंग शक्तींचे केंद्रीकरण करुन ज्यापद्धतीने आपले वर्चस्व मिळविले आहे, त्यामुळे पार्टीत उलथापालथ सुरु झाली आहे.

इतिहास साक्ष आहे की, शक्तिशाली किंवा निरंकुश हुकूमशाहांचे दिवसही कधी ना कधी भरतात, संपूर्ण जगावर चीनचे (Chin) प्रभुत्व कायम करुन आपल्या देशाला सुपर पॉवर बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शी जिनपींग ( Xi-Jinping’) यांना आता चिंता वाटू लागली आहे की, कदाचित त्यांचा सत्तापालट तर होणार नाही. चीनमध्ये दर १० वर्षांनंतर कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची पुढची पिठी सत्ता सांभाळणार आहे. परंतु शी जिनपिंग यांनी २०१८ मध्ये राष्ट्रपती पदासाठी कमाल कार्यकाळाची मर्यादा संपवून नेहमीसाठी स्वतःला चीनचा सुप्रीम लीडर म्हणून घोषित केले होते. सत्तापालाटाच्या शक्यतेला टाळता यावे, यासाठी त्यांनी असे केले होते. जिनपिंग यांचे कितीतरी मनमानी निर्णय त्यांच्या पक्षातील सदस्यांना आवडलेले नाहीत. त्यांची उद्धट वर्तणूक व सैन्य शक्तिप्रदर्शन त्याच्यावर भारी पडू शकते. कोरोना संकटामुळे सर्व जगात चीनची बदनामी झाली. असे मानण्यात येत आहे की, एक मोठ्या कटकारस्थांतर्गत चिनी नेतृत्वाने हा जीवघेणा व्हायरस पसरवून जगातील देशाची अर्थव्यवस्था ठप्प करण्याचा कट रचला. हेच कारण आहे की, पाकिस्तान, तुर्की, उत्तर कोरिया, इराण सोडून जगातील सर्व देश चीनला नापसंत करतात.

वरवर पाहता वटते की, चीनी कम्युनिस्ट पार्टी स्थिर आहे. परंतु असे नाही. जिनपिंग शक्तींचे केंद्रीकरण करुन ज्यापद्धतीने आपले वर्चस्व मिळविले आहे, त्यामुळे पार्टीत उलथापालथ सुरु झाली आहे. चीनचे राजकीय नेतृत्व कोणत्याही प्रकारचा विरोध सहन करु शकत नाही व विरोध करण्यास पायाखाली तुडविण्यात येते चीनमध्ये एकेकाळी हजारो विद्यार्थ्यांनी लोकशाहीचा आवाज उठविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थ्यान आन मेन चौकात या आंदोलनकर्त्यांवर गोळ्या झाडण्यात आला होत्या. शी जिनपिंग स्वतःला माओ त्से तुंगसारखा महान कम्युनिस्ट नेता असल्याचे दर्शवू इच्छित आहे. परंतु ते विसरत आहेत की, माओ एक विचारकर देखील होते. व लोकप्रिय नेते च्यांग काई शेक यांच्याशी सामना करुन चीनची सत्ता सांभाळली होती.

कशामुळे आहे नाराजी ?

चीन आपल्या नागरिकांना वाईट अवस्थेत ठेवून सैन्याची क्षमता वाढविण्यावर जोर देत आहे. चीनमध्ये जबरदस्तीने सैन्य भरती केली जात आहे व मेलेल्या सैनिकाच्या कुटुंबाना कोणतीही मदत दिल्या जात नाही. शी जिनपिंग यांनी एकाचवेळी अनेक देशांचे शत्रुत्व पत्करले आहे. भारताची जमीन हडपण्यासाठी त्यांनी लडाखमध्ये घुसखोरी केली. दक्षिण चीन सागरात जपानच्या द्विपांवर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच व्हिएतनाम, कंमोडिया, ऑस्ट्रेलिया यांच्याशीही शत्रुत्व निर्माण केले. अमेरिकासहित सर्व पाश्चिमात्य देश चिनप्रती नाराज आहेत कारण त्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहचली आहे. चीन आपला स्वस्त माल सर्व जगात डम्प करु इच्छित आहे. श्रम नियमांना एका बाजूला ठेवून कमी वेतनात तासनतास कम करवून घेऊन चीन उत्पादन करीत आहे. दुसऱ्या देशांच्या अर्थव्यवस्था कमकुवत करणे व आपला आर्थिक साम्राज्यवाद लागू करणे हाच यामागील हेतू आहे.

संपूर्ण निष्टा इच्छितात

शी जिनपींग यांना आपल्या पार्टीच्या २०२२ मध्ये होणाऱ्या नॅशनल काँग्रेसपूर्वी ( राष्ट्रीय संमेलन) देशाचे सुरक्षा तंत्र मजबूत करायचे आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या निष्ठेवर जिनपिंग यांना जराही शंका आहे. त्यांना ते माओ स्टाईलमध्ये धडा शिकविला जातो. कडक कारवाईनंतर जेलमध्ये सडणे व मृत्यूच्या शिक्षेचे भयदेखील दाखविले जाते. जिनपिंग यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार द्यावा लागतो. ते जे म्हणतील तो कायदा. पक्षात कोण संपूर्णपणे जिनपिंग यांच्या प्रती इमानदार नाही किंवा भिन्न विचार ठेवतात, याची गुप्तपणे माहिती मिळविण्यात येते.

हेरगिरीचा गोरखधंदा

चीनचा कटिलपणा यावरुन दिसतो की, तो जगाच्या २४,००,००० व्हीआयपी लोकांची हेरगिरी करीत आहे. यात भारतातील १०,००० लोकांचा समावेश आहे. यात राजकीय नेते, सैन्याधिकारी, ब्युरो क्रेट, उद्योगपती, संशोधक, न्यायाधीश, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार प खेळाडू, धार्मिक नेते व कार्यकर्त्यांच्या हेरगिरीचा समावेश आहे. चीन हाब्रिड कारफेयरच्या धोरणाचा अवलंब करत आहे. राजकीय नेतृत्वाला कलंकित करुन व घटनात्मक संस्थाना पोकळ करण्याचा कट रचत आहे.