fasting

वास्तविकतेत, उपोषण, संप व आंदोलन यांचे आता कोणतेही नैतिक स्वरुप राहिलेले नाही. आता यात राजकारण आलेले आहे व यामुळे लोक बातम्यांमध्ये झळकत आहेत. कोणताही नेता महात्मा गांधीप्रमाणे आत्मशुद्धीसाठी उपोषण करीत नाही. तर आपल्या मागण्यांवर जोर देण्यासाठी हा मार्ग अवलंबितात. उपोषणाने समस्येचे निराकरण होणे आवश्यक नाही.

देशात अन्नत्यागाची (Abstinence from food) परंपरा पूर्वीपासून व्रत-उपवासाच्या (fasting) रुपात आहे. परंतु राजकारणात उपोषण करण्याचे चलन प्रामुख्याने महात्मा गांधी यांच्या काळापासून सुरु झाले. बापू नेहमी म्हणत होते की, ते आत्मशुद्धीसाठी उपोषण करीत आहे. परंतु त्याचा काही ना काही राजकीय परिणाम होतच होता. ब्रिटिश शासक महात्मा गांधींच्या उपोषणाला हा विचार करुन घाबरत होते की, याची देशव्यापी प्रतिक्रिया होईल. जेव्हा डॉ. आंबेडकर यांनी दलितांसाठी वेगळे मतदान क्षेत्राच्याा मागणीवर जोर दिला तेव्हा महात्मा गांधींनी याविरोधात उपोषण करत चेतावणी दिली. बापूंचे म्हणणे याविरोधात उपोषण करीत चेतावणी दिली. बापूंचे म्हणणे होते की, दलित मागणी सोडावी लागली होती. कारण बापूंचे प्राण धोक्यात होते. बापूंच्या उपोषणाच्या मागे नैतिक बळ होते. त्यांच्यानंतर आचार्य भन्साळी, मास्टर तारासिंह व पोट्टी, श्री. रामुलू अनेक दिवसांपर्यंत चालणाऱ्या उपोषणामुळे वरेच चर्चेत होते. श्री. रामुलू यांचे उपोषण आंध्रप्रदेशच्या निर्मीतीसाठी होते. उपोषण करतानाच त्यांचे निधन झाले होते व त्यानंतर आंध्रप्रदेशाची निर्मीती करावी लागली होती. बापूंचे शिष्य असूनही नेहरू यांनी कधी उपोषण केले नाही. संप सत्याग्रह व उपोषण हे सूत्र महात्मा गांधी यांनी दिले. जे अजूनही कोणत्या ना कोणत्या रुपात सुरुच आहे.

हरिवंश व शरद पवार यांचा उपवास

राज्यसभेतून ८ निलंबित खासदारांचे समर्थन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार सरसावले आहेत. ते या खासदारांसाठी एक दिवसाचा उपवास करणार आहेत. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश गांधीवादी पद्धतीने या खासदारांचे मन जिंकण्यासाठी घरुनच चहा बनवून त्यांच्यासाठी घेऊन गेले. या खासदारांनी चहा प्यायलादेखील नाही. अता हरिवंश स्वः उपोषणावर बसणार आहेत. यामुळे काय मिळणार हे कोणालाही माहीत नाही. उपसभापतींनी उपोषण करणे ही अनोखी गोष्ट आहे.

अण्णा हजारे यांचे उपोषण चर्चेत

संप व उपोषणाची गोष्ट आहे, समाजसेवक अण्णा हजारे यांचे लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी करण्यात आलेलेल उपोषण खूप चर्चेत होते. याचमुळे २०१४ मध्ये भाजप सरकारचा सत्तेच येण्याचा मार्ग सुलभ झाला होता. आता ही गोष्ट समोर आली आहे की, अण्णा आंदोलनाच्या मागे संघ व भाजपचे छुपे समर्थन होते. अण्णा हजारे आपल्या दिल्ली उपोषणानंतर या अभिमानात होते की. आपार जनसमह त्यांच्यामागे आहे. परंतु जेव्हा त्यांनी मुंबईमध्ये उपोषण सोडले. तेव्हा गर्दी गायब होती. संघ व भाजपने अण्णांना वास्तविकतेची जाणीव करुन दिली. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असतानाही अधिकाऱ्यांनी लढाईसाठी तक्तालीन उपराज्यपाल नजीब जंग यांच्याविरोधात रेलभवन परिसरात उपोषण केले होते. तेव्हा दुसऱ्या दिवशी नजीब जंग त्यांच्यासाठी पराठे घेऊन पोहोचले होते. त्यानंतरही एका प्रकरणी केजरीवाल आपल्या मंत्र्यांसहित उपराज्यपालांच्या निवासस्थानी उपोषणावर बसले होते. नंतर केजरीवालांना आपल्या अधिकाऱ्यांच्या सीमा कळल्या व त्यांचा उपराज्यपाल अनिल बैजल यांच्याशी कोणताही वाद झाला नाही.

आत्मशुद्धी नव्हे राजकारण

वास्तविकतेत, उपोषण, संप व आंदोलन यांचे आता कोणतेही नैतिक स्वरुप राहिलेले नाही. आता यात राजकारण आलेले आहे व यामुळे लोक बातम्यांमध्ये झळकत आहेत. कोणताही नेता महात्मा गांधीप्रमाणे आत्मशुद्धीसाठी उपोषण करीत नाही. तर आपल्या मागण्यांवर जोर देण्यासाठी हा मार्ग अवलंबितात. उपोषणाने समस्येचे निराकरण होणे आवश्यक नाही. पूर्वोत्तरमध्ये इरोम शर्मिला यांनी वर्षानुवर्षे उपोषण केले होते. ज्याचा कोणताही परिणाम समोर आला आहे. ख्रिश्चन संस्कृतीमध्ये लेंट पर्वाच्या पार्श्वभूमीवर उपवास केला जातो. परंतु पाश्चिमात्य देशांमध्ये उपोषण राजकारणाच्या हत्याराच्या रुपात कधीच उपयोगात आणला नाही.