मग आम्हालाही हा हक्क मिळायलाच हवा! पीडित पुरुषांनाही संरक्षण हवे?

पतीला पत्नीविरुद्ध कारवाई करायची असेल, तर आपल्या देशात कौटुंबिक हिंसाचार अधिनियमासारखा कायदा उपलब्ध नाही, ' अशा शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचाराच्या एका खटल्यात एक टिपणी नुकतीच केली.

  पुरुष कौटुंबिक हिंसाचाराचे बळी ठरू शकतात का? अनेकांना हा विचारच अविश्वसनीय वाटेल आणि ते स्वाभाविकही आहे. कारण पितृसत्ताक व्यवस्थेत पुरुषाची प्रतिमा कठोर आणि आक्रमक असते. परंतु हे अर्धसत्यच नव्हे का? पूर्वग्रहांनी ग्रस्त समाज नेहमीच कोमलता, समर्पण आणि त्याग या गोष्टी केवळ महिलांशी संबंधित आहेत, असे मानतो. परंतु केवळ शारीरिक फरक हा भावनिक आणि व्यक्तिमत्त्व म्हणून फरक करण्याचा आधार कसा काय ठरू शकेल?

  ‘द सोशल कन्स्ट्रक्शन ऑफ जेंडर’ या त्यांच्या पुस्तकात लैंगिक भेद आणि त्याच्याशी संबंधित पूर्वांग्रहांविषयी म्हटले होते की, पूर्वग्रह हे व्यवहाराचे असे एक स्वरूप आहे, जे समाजाच्या एखाद्या घटकासाठी आक्रमक असते. लैंगिक भेदांशी संबंधित विविध रूढी आणि लिंगाधारित भेदभाव कोणत्याही समाजासाठी घातक ठरू शकतो. समस्येचे मूळ कारण पुरुषांविषयी समाजात रुजलेला कठोर भाव हे असून, त्यामुळेच त्यांच्याकडे सदैव शोषणकर्ता म्हणूनच पाहिले जाते.

  जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जगभरातील स्त्रियांना संघर्षच करावा लागत आहे, यात यत्किंचित शंका नाही. कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी मोठ्या संख्येने महिलाच पडतात हेही खरे आहे. परंतु ही पीडा केवळ महिलाच भोगत आहेत, असा याचा अर्थ होता कामा नये. स्त्री आणि पुरुषांच्या शरीरात असणारा फरक हा त्यांच्या आत निर्माण होणाऱ्या भावनांवरही परिणाम घडवून आणतो, असे आजवर कोणत्याही संशोधनातून सिद्ध झालेले नाही. उलट वास्तव असे आहे की, ईर्षा, द्वेष, घृणा, प्रेम यांसारख्या मानवी भावना स्त्री आणि पुरुष दोहोंमध्ये समान प्रमाणात निर्माण होत असतात.

  भारतीय घटना ज्या मूळाधारावर उभी आहे, तो लिंग, जात आणि धर्माच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव स्वीकारत नाही. मग कौटुंबिक हिंसाचार अधिनियम पुरुषांना संरक्षण का देत नाही ? विकसित देशांमधील लिंगनिरपेक्ष कायदे तेथील पुरुषांना महिलांप्रमाणे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण तर देतातच; शिवाय पुरुष पीडित असू शकतात या वास्तवाचा स्वीकारही करतात. या स्वीकाराहतेमुळे तेथे या विषयावर नेहमीच संशोधन होत आले आहे.

  पुरुष कौटुंबिक हिंसाचाराचे बळी ठरूच शकत नाहीत, अशी धारणा असणारे सामान्यतः असा तर्क देतात की, पुरुष स्त्रीपेक्षा शारीरिकदृष्ट्या अधिक बलशाली असतात. अशा स्थितीत महिला त्यांच्यावर आघात कसा करू शकतील? ‘व्हेन वाइफ बीट देअर ‘हजबंड, नोवन वॉन्ट्स टू बिलीव्ह इट’ या शीर्षकाने प्रकाशित झालेल्या लेखात कॅथी यंग यांनी अशा अनेक प्रकारांची चर्चा केली असून, दोनशेपेक्षा अधिक प्रकरणांचा उल्लेख करून म्हटले आहे की, ‘हिंसक संबंधांमध्ये महिला आक्रमक होण्याची शक्यता पुरुषांइतकीच आढळून आली आहे.’

  त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ जस्टिस आणि सौडीसी यांच्याकडून करण्यात आलेल्या अध्ययनांचा संदर्भ देऊन असे म्हटले आहे. की, कौटुंबिक हिंसाचारांच्या प्रकरणांत ज्या गंभीर हल्ल्यांच्या नोंदी दाखल करण्यात आल्या, त्यांत ४० टक्के तक्रारदार पुरुष होते आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या महिला होत्या. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सची आकडेवारी असे सांगते की, अमेरिकेत घरगुती गैरवर्तताचा बळी ठरलेल्या तिघांमधील एक पुरुष असतो.

  Then we must get this right too Victim men also need protection