काँग्रेस नेतृत्वाला जागे करण्याचा प्रयत्न

पक्षात पदावर असे नेते लादले गेलेत जे वेतनभोगी स्वरुपात काम करीत आहेत. हे वेतनभोगी पक्षाचे साधे प्राथमिक सदस्यही नाहीत. त्यांनी सोनिया गांधीना आग्रह केला की, त्यांनी कौटुंबिक मोहाबाहेर पडून पक्षांतर्गत लोकशाहीचे मूल्य समजावे.

काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर जो धुरळा उडाला तो खाली बसत नाही तोच आता दुसऱ्या पत्राने धमाका केला. गेल्यावर्षी ज्या ९ उत्तरप्रदेशी नेत्यांना घरचा रस्ता दाखविला होता त्यांनी उघडपणे काँग्रेसच्या काही नेत्यांवर आरोप केला. पक्षात पदावर असे नेते लादले गेलेत जे वेतनभोगी स्वरुपात काम करीत आहेत. हे वेतनभोगी पक्षाचे साधे प्राथमिक सदस्यही नाहीत. त्यांनी सोनिया गांधीना आग्रह केला की, त्यांनी कौटुंबिक मोहाबाहेर पडून पक्षांतर्गत लोकशाहीचे मूल्य समजावे. पत्रात विचारणा केली गेली की, राहूल गांधी स्वतःला पक्षाध्यक्ष पदाचे उमेदवार करणार की नाहीत? जर नाहीत तर काही नेत्यांना अशी मागणी करण्यापासून परावृत्त करावे. असहमती दर्शविणाऱ्या अध्यक्ष बनत असतील तर काही आक्षेप नाही. त्यांचा आक्षेप एवढाच आहे की, राहूल गांधी पूर्णकालीन नेता स्वरुपात राहण्यास तयार नाहीत पण संघटना चालवू इच्छितात.

ज्या २३ नेत्यांनी यापूर्वी पत्रपंच करुन पुनरुद्धाराची मागणी केली त्यांना गद्दार ठरविण्यात येत आहे. पत्र लिहिणारे नेते चंद्रशेखर, मोहन धारिया. कृष्णकांत व रामधानसारखे तरुणतुर्क नाहीत. त्यांनी इंदिरा गांधींच्या पुढे आव्हान उभे करण्याची हिंमत केली होती. यात काही वरिष्ठ आहेत तर काही युवानेते आहेत. त्यांची काँग्रेससोबत बांधीलकी आहे. काँग्रेसच्या वर्तमान स्थीतीबाबत ते चिंताग्रस्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोडीचा नेता पक्षाचा अध्यक्ष असावा. शंभर वर्षे वयाची काँग्रेस मोदींच्या पुढे खुजी वाटणे त्यांना असह्य होत आहे. देशांतर्गत अनेक राज्यांत काँग्रेस मुळासकट उखडल्या गेली आहे. त्यांना याबाबत अतोनात दुःख आहे. भाजपकडे अमित शहासारखा व्यवहारदारी नेता आहे. संघ परिवार जमीनस्तरावर भाजपला मजबूत करीत आहे. पण, काँग्रेस पक्षात असे नाही.

पक्ष भाजपाचा विकल्प कसा बनणार?

सन २०१९ मध्ये गतवर्षी काँग्रेसची व्होट बँकही १९.५ टक्के रिक्त झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह घसरगुंडीवर बसला. त्यांची लढण्याची शक्ती क्षीण झाली. पक्षाचे नेते शून्यावर बाद खेळाडूच्या लायकीचे झालेत. त्यामुळे पत्र लिहिणाऱ्या काँग्रेसी नेत्यांना पक्षाचे भविष्य अंधकारमय वाटत आहे. झोपलेल्या नेत्यांना जागे करण्यासाठी त्यांचे हे पत्र रामबाण इलाज वाटले. पक्ष संकटाचा सामना करीत आहे. हे संकट भविष्यात वाढत्या आलेखावर असेल ही त्यांना भीती आहे. हे संकट भविष्यात वाढत्या नेतृत्वाचे संकट स्वीकारावे. त्यापेक्षा वेगळा मार्ग दिसत नाही. वैकल्पिक. विश्वसनीय व प्रेरणादायक नेतृत्वानिच काँग्रेसकडे दुसरी संधी दिसत नाही.

मोदींच्या तुलनेत कोण?

५० वर्षीय राहूल गांधींच्या आतापर्यंतच्या कामगिरीने स्पष्ट केले की, ते मोदींना शह देऊ शकणार नाहीत. सोनिया गांधीची प्रकृती त्यांना साथ देत नाही. गोव्यात काँग्रेसने जास्त जागा जिंकल्या, पण तेथे पक्ष सरकार स्थापनेस अपयशी ठरले आहे. मध्यप्रदेशात सरकार उभे केले. पण लवकरच कोसळले. राजस्थान कसेबसे सावरले. राहूल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारले नाही. पण ते निर्णय मात्र घेताहेत. काँग्रेसकडे अजूनही जमिनीस्तरावर जनाधार आहे. तो सुप्त ज्वालामुखी जागा करावा लागेल. तो जागे करण्याची ताकद असलेला नेता हवा, मजबूत विरोधी पक्ष स्वरुपात दिसणे काँग्रेससाठी आत्यंतिक गरजेचे आहे.

हे नेतेही कमी नाहीत

कपिल सिब्बल हे निष्णात वकील आहेत. ते तर्कस्वरुपात कुण्याही विरोधक नेत्याला आडव्या हाताने घेऊ शकतात. इंग्रजी-हिंदीवर त्यांचा प्रभाव आहे. आनंद शर्मा हे सुद्धा प्रशासकीय स्तरावर कर्तबगार आहेत. गुलामी नबी आझाद हे काँग्रेसच्या तीन पिढ्यांचे साक्षीदार व निष्ठावंत आहेत. अशा नेत्यांना वाऱ्यावर सोडणे काँग्रेससाठी नुकसानदायक आहे.