उद्धव-मोदी बंद खोलीत चर्चा : आघाडी सरकारमध्ये खळबळ, सरकार टर्म पूर्ण करणार काय?; राज्यात राजकीय अस्थिरता वाढेल व त्याचा फायदा भाजप उचलू शकते

वी. पी. सिंग यांच्या सरकारचे हाल आम्ही पाहिले. काही आघाड्या निवडणुकीपूर्वी आकारास येतात अन काही निवडणुकीनंतर तयार होतात. जर एकाच पक्षाचे सरकार बनत नसेल तर २-३ पक्ष एकत्र येऊन बाशिंग बांधतात. आता हा सारा भाग सर्वसामान्यांना अभद्र वाटत असला तरी एक गरज स्वरूपात त्याकडे पहिल्या जाते.

  हिस्सेदारीची शेती नुकसानीची भीती अशी एक म्हण आहे. देशाने संयुक्‍त सरकारचा अनुभव घेतला. विचार व महत्त्वाकांक्षा यांची जेव्हा टक्कर होते तेव्हा सरकारला हादरे बसतात व ते मग डगमगू लागते. केंद्रातील तत्कालीन मोरारजी देसाई यांचे जनता पार्टी सरकार, देवेगौडा- गुजराल यांचे संयुक्‍त मोर्चा सरकार आदींची स्थिती देशाने अनुभवली.

  वी. पी. सिंग यांच्या सरकारचे हाल आम्ही पाहिले. काही आघाड्या निवडणुकीपूर्वी आकारास येतात अन काही निवडणुकीनंतर तयार होतात. जर एकाच पक्षाचे सरकार बनत नसेल तर २-३ पक्ष एकत्र येऊन बाशिंग बांधतात. आता हा सारा भाग सर्वसामान्यांना अभद्र वाटत असला तरी एक गरज स्वरूपात त्याकडे पहिल्या जाते.

  परस्पर विचारधारेची मंडळी एकत्र येऊन मसाला बनवितात व मग त्याला सरकार टर्म पूर्ण भाजीसाठी वापरतात. तयार झालेली भाजी टेस्टी असते असा भागच नसतो. कुणाला ती तिखट तर कुणाला ती खारट वाटू लागते अन तक्रारी सुरू होतात. समान किमान कार्यक्रम घेऊन सरकार चालविण्याची भाषा नंतर मागे पडते.

  ‘मेरी मुगीकी एक टांग’ प्रकार प्रारंभ होतो एकमेकांच्या जिवावर उठतात पण सरकार मात्र पडत नाही. कारण विचारले तर सत्ता. ती सोडायची कुणाची तयारीच नसते. महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार महाआघाडी स्वरूपात अधिकारावर आले. शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षेला राष्ट्रवादीने खतपाणी घातले. काँग्रेसने तिफण चालविली अन शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षेला अंकुर फुटला. कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना आणि धर्मनिरपेक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी ही परस्पर विरोधी टोकं एकत्र आल्यानंतरही सरकार सुरूच आहे.

  आता यावर चिंतन करतो म्हटले तर शरद पवार यांच्याकडे लक्ष केंद्रित होईल. शरद पवार यांच्या मार्गदर्शनात सरकार चालत असल्यामुळे विचारांचा सुप्त ज्वालामुखी उफाळला नाही. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी गुप्त डील करून सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला होता पण शरद पवार यांनी तो हाणून पडला. त्यानंतर राज्यात महाआघाडीचे सरकार अधिकारावर आले.

  सरकार टर्म पूर्ण करणार काय?

  आता प्रश्‍न असा आहे की, राज्यातील आघाडी सरकार खरचं आपली टर्म पूर्ण करणार काय? राष्ट्रवादीने दावा केला की, सरकार आपली टर्म नक्कीच पूर्ण करणार आहे. दुसरीकडे शिवसेनेने दावा केला की, सरकार वाचविणे ही आमची जबाबदारी नाही. आता प्रश्‍न काँग्रेसचा आहे. हा पक्ष राष्ट्रवादीच्या दबावाला आता कंटाळला आहे.

  एकदा राहुल गांधींनी स्पष्ट केले होते की, आम्ही महाराष्ट्रात काही निर्णय घेऊ शकत नाही. ते निर्णय आम्ही पंजाब- राजस्थानमध्ये घेऊ शकतो. कारण पंजाब, राजस्थानमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. महाराष्ट्रात टेकू म्हणून काँग्रेसची सरकारमध्ये प्रतिमा आहे. तरी पण काँग्रेस आपला कुठे हक्‍क सोडायला तयार नाही. आता हा मामला दर्शवितो की, राज्यात राजकीय अस्थिरता वाढेल व त्याचा फायदा भाजप उचलू शकते.