वसुंधरा-पायलट यांनी धारण केले मौन, काँग्रेस- भाजपात मात्र धाकधूक

  • केंद्रीय मंत्री व भाजप नेते गजेंद्रसिंह शेखावत यांना राजस्थानमध्ये सुरु झालेले राजकीय संकट व वसुंधरा राजेंची चुप्पी संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले हा भागही रणनीतीचा असू शकतो. कधी कधी मौनही शब्दांपेक्षा प्रभावी ठरु शकते. शेखावत यांनी या संदर्भात फारसे विश्लेषण केले नाही हा भाग नामानिराळा.

राजस्थानची राजकीय स्थिती आयसीयूमध्ये आहे. काय होईल निश्चित असे काहीच सांगता येणार नाही. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री व भाजप नेत्या वसुंधरा राजे व माजी उपमुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या मौन साधल्याने दोन्ही पक्षात धाकधूक वाढली आहे. थरार चित्रपटासारखी राजस्थानची राजकीय स्थिती आहे. ज्यांचे कार्ड ओप झाले नाही ते संशयास्पद वाटताहेत. राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे यांनी चुप्पी साधल्यामुळे मामला गंभीर वाटतो. राजस्थान संदर्भात त्यांनी एक शब्द उच्चारला नाही हे विशेष. 

ही रणनीती आहे काय ? 

केंद्रीय मंत्री व भाजप नेते गजेंद्रसिंह शेखावत यांना राजस्थानमध्ये सुरु झालेले राजकीय संकट व वसुंधरा राजेंची चुप्पी संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले हा भागही रणनीतीचा असू शकतो. कधी कधी मौनही शब्दांपेक्षा प्रभावी ठरु शकते. शेखावत यांनी या संदर्भात फारसे विश्लेषण केले नाही हा भाग नामानिराळा. राजे वसुंधरांनी या संदर्भात ट्विट करताना म्हटले की काही लोक केवळ भ्रम निर्माण करीत आहेत. वसुंधरा राजेंच्या संदर्भात केवळ एवढे सांगितल्या जात आहे की त्यांचे गहलोतांसोबत चांगले संबंध आहेत. सचिन पायलटसारख्या उगवत्या सूर्याला थारा दिला चर राजस्थानमध्ये भाजपची वाट लागेल अशी भीतीही भाजपाई व्यक्त करीत आहेत. यातूनच वसूंधरा राजे तटस्थ भूमिकेत आहेत. त्या ना कुणाच्या समर्थनार्थ बोलत आहेत ना कुणाचा त्या विरोध करीत आहेत. केंद्रीय नेत्यांना राजस्थानमध्ये सुरु झालेल्या हस्तक्षेपावरही त्यांनी मौन साधले आहे. राजस्थानमध्ये हॉर्स ट्रेडींग मोठ्या रक्कमेवर स्थिरावले आहे. येथे आमदाराच्या किंमतीने आजपर्यंत सर्वच उच्चांक मोडीत काढले असल्याची शक्यताही वर्तवणियात येत आहे. शक्ती परीक्षणात जेवढा उशीर तेवढी गहलोतांची स्थिती अवघड होताना स्पष्ट होत आहे. गहलोत व पायलट आपापल्या आमदारांना सोबत ठेवण्यासाठी सारखे धडपडत आहेत. राज्यपाल म्हणाले की, जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात. माझ्याकडे बहुमत आहे तेव्हा त्यांना शक्तीपरीक्षणाची गरजच काय? ते अधिवेशन कशासाठी बोलावण्याची घाई करीत आहेत. 

पायलट यांचेही मौन 

सचिन पायलट यांना जेवढा हंगामा करायचा होता तो त्यांनी केला. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना त्यांनी चांगले धारेवर धरले. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनाही त्यांनी जुमानले नाही. त्यांनी बंडाटा झेंडा उभा केला. पायलट यांना आपल्य़ा शक्तीवर विश्वास आहे. हरियाणासारख्या राज्यात त्यांनी आपल्या बंडोबा आमदारांना ठेवले. येथे धडक मारणे गहलोत यांना शक्य नव्हते. पायलट यांच्या पाठीशी आपण आहोत. हे भाजपाने नाकारले आहे. केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले की, राजस्थानच्या राजकीय घटनाक्रमात भाजपला काही लेण-देणे नाही. ही काँग्रेसची आपसी लढाई आहे. मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील हे वैमनस्य आहे. राजस्थानमध्ये हा ड्रामा यासाठी उभा झाला की मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना सचिन पायलट व त्यांचे आमदार काँग्रेसमध्येच नकोत. ते त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याच्या तयारीत आहेत. राजस्थान काँग्रेस विधायक दलाच्या अर्जावर विचार करुन विधानसभा अध्यक्षांना पायलट व त्यांच्या आमदारांवर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पायलट यांनी या नोटीसीला हायकोर्टात आव्हान दिले. पायलट व त्यांच्या आमदारांनी विधानसभेत पक्षाच्या व्हिपची अवहेलना केली नाही कारण विधानसभेचे अधिवेशन सुरु नाही. पक्षबदलाची शंका अयोग्यतेचा आधार बनू शकत नाही. कुण्याही राजकीय पक्षात जो नेता पक्षांतर्गत अधिक समर्थन प्राप्त करु शकतो तो वरिष्ठ स्थानी राहण्याचा हक्कदार असतो. 

भाजपची भूमिका काय? 

काँग्रेसमध्ये उभी फूट दिसताच केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भाजपचे ओम कटारियासारख्या नेत्यांनी गहलोत सरकारवर हल्लाबोल केला. यात वसुंधरांचा समावेश नाही. रालोआचे खासदाक हनुमान बेनिवाल यांचा आरोप आहे की. वसुंधरा ह्या गहलोतांच्या डुबत्या नावेला आधार ठरतील. त्या अल्पमत सरकारला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.