अमेरिकेला मिळणार काय भारतीय वंशाच्या उपराष्ट्रपती कमला

अमेरिकेची डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार कमला ह्रॅरीस मूळ भारतीय वंशाच्या आहेत. डेमॉक्रॅटिकची नजर मूळ भारतीय मतदात्यांवर केंद्रीत झाली आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा यातूनच झाली आहे. भारतीय मुळ असलेल्या मतदात्यांनी गेल्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन केले होते. कमला यांच्या उमेदवारीमुळे अमेरिकेच्या राजकारणातील बरीच समीकरणे बदलली आहेत.

भारतीय वंशाचा कुणी विदेशात उच्चपदावर आरुढ झाला अथवा होत असल्याचे दिसताच आमचा आनंद मात्र गगनात मावेनासा होतो. तो एवढा ओसंडून वाहतो की विचारता सोय नाही. ब्रिटनचे अर्थमंत्री शौनक ऋषी इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्तींचे जावई आहेत. तेथेच प्रीती पटेल गृहराज्यमंत्री आहेत. आयर्लंडचे पंतप्रधान लियो वराडकर मूळ भारतीय वंशाचे आहेत. त्यांनी मागे भारताचा दौराही केला होता. अमेरिकेचे यूएनमधील राजदूत तसेच साऊथ कॅरोलाईना येथील राजदूत राहिलेल्या निक्की हेलिंची आई शीख समुदायातून होती. कॅनडामध्ये तर मूळ भारतीय असलेले काही मंत्री टूडो सरकारमध्ये सामील आहेत. आता अमेरिकेची डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार कमला हॅरीस मूळ भारतीय वंशाच्या आहेत. डेमॉक्रॅटिकची नजर मूळ भारतीय मतदात्यांवर केंद्रीत झाली आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा यातूनच झाली आहे. भारतीय मुळ असलेल्या मतदात्यांनी गेल्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन केले होते. कमला यांच्या उमेदवारीमुळे अमेरिकेच्या राजकारणातील बरीच समीकरणे बदलली आहेत. तेथील निवडणुकांनी उत्कंठा वाढविली आहे. कमला हॅरीस निवडणूक जिंकल्या तर त्या भारतीय मुळ असलेल्या प्रथम उपराष्ट्रपति असतील. 

ट्रम्पसोबत टक्कर 

कमला हॅरीस आव्रजन (इंटीग्रेशन) मुद्द्यावर राष्ट्रपती ट्रम्प यांच्या नीतींची कठोर शब्दात आलोचना करीत आहेत. स्पष्ट शब्दात त्या म्हणाल्या की, अमेरिकेची आर्थिक स्थिती सुदृढ बनविण्यात विदेशातून आलेल्या मंडळीची प्रमुख भूमिका राहिली आहे. भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याची भाषा बोलणारे ट्रम्प भारतीय कामगारांना अमेरिकेत येण्याच्या मार्गावर स्पीडब्रेकर्स उभे करीत आहेत.

भारत आजोळ

कमला हॅरीस यांच्या आईचे नाव शामला गोपालन आहे. वयात येईपर्यंत त्या दरवर्षी आपल्या लहान बहिणीसमवेत आजी-आजोबांना भेटण्यासाठी यायच्या. हिंदू मंदिरात आईच्या संस्काराने त्यांचे जाणे-येणे आहेच. त्या निवडणुकीत विजयी झाल्या तर त्यांचा झुकाव भारताकडे असेल हे मात्र आजच स्पष्ट करता येणार नाही. 

जम्मू-काश्मीर मध्ये ३७० कलम हटविल्यानंतर विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी डिसेंबर २०१९ मध्ये अमेरिकेचा दौरा केला होता. तेथे त्यांनी अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पोम्पीयो यांच्या भेटीची वेळ मागितली होती. पण, वेळेच्या अभावाचे कारण देऊन पोम्पीयो यांनी संसदीय दलासोबतची आपली बैठक रद्द केली. भारतीय वंशाच्या अमेरिकी खासदार प्रमिला जयपाल यांनी ३७० कलम गुंडाळल्यामुळे भारत सरकारची आलोचना केली होती. जयशंकर म्हणाले की, प्रमिला यांना भेटण्याचे काही औचित्य नाही. भारतीय विदेश मंत्र्यांच्या या कृतीचे कमला हॅरीस यांनी प्रखर शब्दात निर्भत्सना केली होती. 

ट्रम्प म्हणाले, दुष्ट महिला

कमला हॅरीस यांना उपराष्ट्रपतिपदाची उमेदवार बनविल्यामुळे ट्रम्प यांनी डेमॉक्रॅटीकची टर उडविली. टिकेच्या सर्व क्रिया ओलांडून ते म्हणाले, कमला दुष्ट महिला आहेत. त्यांनी एका प्रकरणात सुनावणी सुरु असताना सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशासोबत असाधारण स्वरुपाचा वाईट व्यवहार केला होता.