चीनच्या घुसखोरीबाबत सरकार स्पष्ट का सांगत नाही?

भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही किंवा भारताची एक इंच जमिनही कोणाच्या ताब्यात नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य वादग्रस्त ठरलेले आहे. आमचे २० जवान शहीद झाले, परंतु जे आमच्या

 भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही किंवा भारताची एक इंच जमिनही कोणाच्या ताब्यात नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य वादग्रस्त ठरलेले आहे. आमचे २० जवान शहीद झाले, परंतु जे आमच्या मातृभूमीकडे तिरप्या नजरेने पाहात होते, त्यांना मात्र धडा शिकविला या पंतप्रधानांच्या वक्तव्यावर राहूल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. ही जमीन चीनची होती का? जर ती जमीन चीनची होती तर मग आमचे जवान शहीद का झाले? ते जवान कुठे शहीद झाले? राहूल गांधींच्या या प्रश्नांचे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी समर्थन केले आहे. लष्करप्रमुख, संरक्षणमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी या संदर्भात जे वक्तव्य केले होते, त्याच्या अगदी विरुद्घ पंतप्रधानांचे वक्तव्य आहे. जर चीनी सैनिकांनी एलएसी ओलांडून भारतीय सीमेत प्रवेश केला नव्हता तर ५ आणि ६ मे रोजी भारतीय कमांडर चिनी कमांडरसोबत कोणत्या मुद्द्यावर बैठक आयोजित केली होती? ६ जून रोजी कमांडरसोबत झालेल्या बैठकीचा विषय कोणता होता, जर चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसखोरी केली नव्हती तर १५ आणि १६ रोजी झालेल्या संघर्षात भारतीय जवान शहीद कसे काय झाले? जेव्हा-केव्हा भारत-चीन सीमावाद उपस्थित होतो. तेव्हा भारतीय नेत्यांवर टीका-टिप्पणी केल्या जाते. पूर्वीपासूनच या संकटाकडे लक्ष दिल्या जात नाही. चीन एक मोठी शक्ती आहे. 

चीनचे आव्हानही मोठे आहे आणि या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आमच्याकडे पुरेसा वेळ नाही, असे म्हणून हा मुद्दा टाळण्यात येतो. वेळेपूर्वीच गुप्तचर संस्थांना सक्रीय का करण्यात येत नाही? सैन्य आणि गुप्तचर संस्थांमध्ये ताळमेळ असणे आवश्यक आहे. इ.स. १९६२ मध्ये आम्ही गाफिल होतो देशाच्या उत्तर सीमेवर कोणीही हल्ला करु शकत नाही, असे आम्हाला वाटत होते. परंतु आता  मात्र परिस्थिती बदलली आहे. चीन दगाबाज आहे हे आम्हाला आता पुरते ठाऊक झाले आहे. पंतप्रधान आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या गोष्टी करतात, परंतु देशाची सुरक्षा सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आता १९६२ चा भारत जरी नसेल, परंतु हेही विसरता काना नये की, चीनची आर्थिक आणि लष्करी शक्तीसुद्धा १० पट वाढलेली आहे. पूर्व लडाखमधील गलवान घाटीची परिस्थिती जरा वेगळी आहे. मे महिन्यामध्ये चीनने पैगांगच्या ८ किलोमीटर क्षेत्रामध्ये अनेक बंकर बनविलेले आहेत. हे क्षेत्र भारताचा भाग आहे. फिंगर ४ ते फिंगर ८ पर्यंतचे उंच पहाडी क्षेत्र चीनने ताब्यात घेतले आहे. जेव्हा दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु होती तेव्हा चीनने गलवान खोरे आणि घोघरा हाटसप्रिंग क्षेत्रामध्ये गस्तावर असलेल्या भारतीय सैनिकावर चिनी सैन्यांनी हल्ला चढविला होता.