कुठेतरी पाणी मुरतंय; योगी-प्रशंसेचा अन्वयार्थ लावणे गरजेचे

पश्चिम बंगालमधील दारूण पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची भिस्त आता उत्तरप्रदेशावर आहे, हे लपलेले नाही. उत्तरप्रदेशात गेल्या निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळविले होते. मात्र निकाल लागल्यानंतर अनपेक्षितरित्या योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपद बहाल केले होते.

  वास्तविक आदित्यनाथ हे त्यावेळी खासदार होते; तरीही त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे त्यावेळचे अध्यक्ष अमित शाह यांच्या धक्कातंत्राला साजेसेच. तथापि, धक्कातंत्र काही काळ आकर्षक वाटले तरी त्याची उपयुक्तता कालांतराने दृग्गोचर होऊ लागते. गोवंश हत्येच्या आरोपांवरून झालेले रणकंदन, रोमियोविरोधी गटांची निर्मिती, कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार यामुळे आदित्यनाथ यांची प्रतिमा एका कठोर प्रशासकाची झालेली होती.

  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मात्र त्या प्रतिमेस तडे गेले. हेलपटलेली आरोग्य यंत्रणा, प्राणवायूची कमतरता, कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची झालेली विटंबना या सगळ्याने आदित्यनाथ सरकार टीकेचे लक्ष्य ठरले आणि भाजपामधूनदेखील आदित्यनाथ यांच्या विरोधात सूर उमटू लागले. साहजिकच शेजारील उत्तराखंडमध्ये गेल्या काही महिन्यांत तीनदा मुख्यमंत्री परिवर्तन करण्याची जी नामुष्की भाजपावर आली तीच वेळ उत्तरप्रदेशात पुढील वर्षीच्या सुरुवातीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर येते का, हा प्रश्‍न उपस्थित झाला होता.

  नुकत्याच केलेल्या उत्तरप्रदेश दौर्‍यात पंतप्रधान मोदी यांनी आदित्यनाथ यांची तोंडभरून प्रशंसा केली. त्यामुळे आता आदित्यनाथ यांना बदलण्यात येणार नाही पश्‍चिम बंगालमधील दारुण पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची भिस्त आता उत्तरप्रदेशवर आहे, हे लपलेले नाही . उत्तरप्रदेशात गेल्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत यश मिळविले होते. मात्र, निकाल लागल्यानंतर अनपेक्षितरित्या योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपद बहाल केले होते.

  हे निश्‍चित झाले आहे. तथापि, मुळात मोदींना आदित्यनाथ यांच्या प्रशंसेतून नेमका कोणता संदेश द्यायचा होता आणि कोणाला द्यायचा होता याचा अन्वयार्थ लावणे गरजेचे. मोदींनी आपल्या वाराणसी मतदारसंघाला भेट दिली आणि सुमारे दीड हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण केले. त्यावेळी केलेल्या आपल्या अर्ध्या तासांच्या भाषणात मोदींनी आदित्यनाथ यांच्या कारभारावर स्तुतिसुमने उधळली. एरव्ही यात अचंबा वाटावा असे काही नाही.

  आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांविषयी पंतप्रधानांनी प्रशंसोद्गार काढणे स्वाभाविक. तथापि, मोदींनी आदित्यनाथ यांची स्तुती केली ती गेल्या साडेचार वर्षांत उत्तरप्रदेशात केलेल्या विकासासाठी आणि मुख्य म्हणजे करोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी. वास्तविक उत्तर प्रदेशात विकास झाला असल्याचा दाबा केला जात असला तरीही जातीय समीकरणात भाजपाला रोषाचा सामना करावा लागत आहे, हे विसरता येणार नाही.

  मुख्य म्हणजे काँग्रेसमधून जितीन प्रसाद यांना आयात करण्याची वेळ भाजपावर आली ती मुख्यतः तेथील ब्राह्मण समाजाला चुचकारण्यासाठी. ब्राह्मण समाजातून आदित्यनाथ यांच्याविषयी अनेक तक्रारीही आहेत. याच पार्शूवभूमीवर मध्यंतरी आदित्यनाथ मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या आल्या होत्या आणि मोदींचे निकटवर्तीय ए. के. शर्मा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार अशाही वदंता होत्या. तथापि, आदित्यनाथ यांनी अखेरीस शर्मा यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदावर बोळवण करण्यात यश मिळविले आहे.

  एका अर्थाने मोदींनी आदित्यनाथ यांच्या केलेल्या प्रशंसेचा अर्थ आदित्यनाथ यांना मोदी यांचा पूर्ण पाठिंबा आहे हा आहे आणि उत्तरप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढण्यात येतील हा संदेश मोदींनी त्यातून दिला आहे.

  Yogi praise needs to be interpreted