या रक्षाबंधनाला बनवा ओल्या नारळाचे लाडू

ओल्या नारळाचे लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये किसलेलं नारळ मंद आचेवर भाजून घ्या. पॅनमध्ये तूप आणि मावा टाकून वेगळ्याने भाजून घ्या.

  दोन दिवसांनी रक्षाबंधन आहे. भाऊ बहिणीच्या या प्रेमळ नात्याचा गोडवा वाढविण्यासाठी वेगळा आणि गोड पदार्थ बनविण्याचा जर तुम्ही विचार करीत असाल तर ओल्या नारळाचे लाडू नक्की बनवून पहा.

  साहित्य-
  – 1 ½ कप किसलेलं ओले नारळ
  -1 चमचा तूप
  -1 कप दूध

  कृती-
  ओल्या नारळाचे लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये किसलेलं नारळ मंद आचेवर भाजून घ्या. पॅनमध्ये तूप आणि मावा टाकून वेगळ्याने भाजून घ्या. आता सर्व मिसळून हालवून घ्या. तुपात भाजलेले सुके मेवे यात घालून चांगल्या प्रकारे हालवून घ्या. नंतर हलकं गार झाल्यावर लाडू वळून घ्या. त्यावर खोबरा बुरा घालून आपल्या कुटुंबियांचे तोंड गोड करा.