kaju pista roll

गणपतीच्या सणाच्या काळात जर तुम्हाला मिठाई(Sweet For Ganeshotsav) बनवायची असेल तर काजू पिस्ता रोल(Kaju Pista Roll Recipe) हा बेस्ट ऑप्शन आहे.

    सणाच्या(Festival) दिवशी घरात बनलेले गोड पदार्थ खाल्ले की, आपलं मन आणि पोट दोन्ही तृप्त होते. गणपतीचा(Ganeshotsav 2021) सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपतीच्या पहिल्या दिवशी तर सगळीकडे मोदक असतात. मात्र प्रत्येक दिवशी गोड काय करावं, असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. गणपतीच्या सणाच्या काळात जर तुम्हाला मिठाई(Sweet For Ganeshotsav) बनवायची असेल तर काजू पिस्ता रोल(Kaju Pista Roll Recipe) हा बेस्ट ऑप्शन आहे.

    काजू पिस्ता रोलमध्ये ड्राय फ्रूट्स असतात. त्यामुळे ते चवीला सर छान लागतातच शिवाय ऊर्जा वाढीला मदत करतात. सध्या कोरोनामुळे बाहेरची मिठाई खाण्यापेक्षा घरी मिठाई बनवायला अनेकजण प्राधान्य देत आहेत. तुम्हालाही काजू पिस्ता रोल ही रेसिपी बनवायची असेल तर साहित्य आणि कृती जाणून घ्या.

    साहित्य : काजू – ७५० ग्रॅम, पिस्ता – ३०० ग्रॅम, साखर चौकोनी तुकडे – ८०० ग्रॅम, वेलची पावडर – ५ ग्रॅम, चांदीचा वर्ख (ऑप्शनल आहे.सजवण्यासाठी)

    कृती : सगळ्यात आधी काजू भिजवा. त्यानंतर पिस्ताची साल काढून घ्या. काजू आणि पिस्ता दोन्ही वेगवेगळे बारीक करून त्यांची पेस्ट बनवा. त्यानंतर काजूमध्ये ६५० ग्रॅम साखर आणि पिस्ताच्या मिश्रणात १५० ग्रॅम साखर घाला. आता दोन्ही मिश्रण वेगवेगळं शिजवा. या दोन्ही मिश्रणात साखर पूर्ण विरघळल्यानंतर  वेलची पूड घाला. मिश्रण पॅनमधून एका भांड्यामध्ये काढून घ्या. आता काजू आणि पिस्त्याचं हे मिश्रण वेगवेगळं लाटून घ्या. या दोन्ही लाटलेल्या पात्या एकावर एक ठेवून त्याचे रोल करा. ह्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेल्या विविध ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता. सगळ्यात शेवटी हे रोल्स चांदीच्या वर्खाने सजवा. काजू पिस्ता रोल तयार.