उपवासासाठी बनवा खास बटाट्याची गोड कचोरी

साहित्य : १ नारळाचे खोबरं , तूप , काजू, बेदाणे, खसखस , साखर १ वाटी , मीठ. बटाटे ७/८ , आरारूट ५० ग्रा., तळण्याकरिता तेल.

 साहित्य :

 १ नारळाचे खोबरं , तूप , काजू, बेदाणे, खसखस ,  साखर १ वाटी , मीठ.
बटाटे ७/८ , आरारूट ५० ग्रा.,  तळण्याकरिता तेल.
कृती :
बटाटे उकडून बाजूला ठेवावेत. थोडं खोबरं आणि खसखस मिक्सरमधे वाटून घ्यावी.( पाणी घालू नये)
 
सारण :
कढई मधे तूप गरम करुन त्यावर राहिलेले खोबरं थोडं भाजून घ्यावे .मग साखर घालावी.
मग त्यात काजू,बेदाणे घालून नंतर वाटलेले खोबरं खसखस घालावी. अगदी चिमूटभर मीठ घालून उतरवावे.
एका ताटात पसरून ठेवावे ( गार होण्यासाठी ).
बटाटे सोलून किसून घ्यावे त्यात थोडंस मीठ आणि आरारूट घालून चांगले मळून घ्यावे. कोरडं व्हायला पाहिजे.मग या बटाट्याची छोटी गोळी करून ती हातावर चेपून चपटी करून त्यात सारण भरून गोल कचोरीचा आकार द्यावा .
तेलात मंद आचेवर खरपूस तळून गरम गरमच खावी.याबरोबर नुसती दह्यातील दाण्याचं कूट आणि खोबरं घातलेली चटणी छान लागते. ( चवीपुरतं मीठ व साखर घालावी ).