बनवा अगदी सोप्प्या पद्धतीने चॉकलेट केक

सध्या अनेक बेकरी, केक शॉप्स बंद आहेत. अशातच तुम्हाला जर केक खायची इच्छा झाली तर अगदी सोप्प्या पद्धतीने तुम्ही चॉकलेट केक घरातच बनवू शकता आणि तेही एकदम कमी सहित्यामध्ये....

 सध्या अनेक बेकरी, केक शॉप्स बंद आहेत.  अशातच तुम्हाला जर केक खायची इच्छा झाली तर अगदी सोप्प्या पद्धतीने तुम्ही चॉकलेट केक घरातच बनवू शकता आणि तेही एकदम कमी सहित्यामध्ये….

चला तर मग या केक ची कृती जाणून घेऊयात 
साहित्य : 
२ कप मैदा
३/४ कप कोको पावडर
१ १/२ कप साखर
३/४ कप घट्ट लोणी
२ टीस्पून  बेकिंग पावडर
४ अंडी
१ टीस्पून व्हॅनीला इसेन्स  
१/२ कप गार दुध 
२ टेबलस्पून रेड वाईन + २ टेबलस्पून साखर-पाणी (आवश्यतेप्रमाणे/पर्यायी)
 
कृती:
१. मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर एका मोठ्या पातेल्यात बारीक चाळणीतून चाळून एकत्र करून  घ्या.
२. साखर दळून बारीक करून घ्या. लोणी आणि साखर एकत्र करून छान फेटून घ्या. साखर पूर्ण विरघळून एकदम स्मूथ टेक्स्चर आले पाहिजे. अंडी वेगळी फेटून घ्या.
३. फेटलेल्या अंड्यात फेटलेलं लोणी-साखर घालून सगळे पुन्हा एकत्र फेटून घ्या. फेटताना एकाच दिशेने फेटा. सगळे मिश्रण एकजीव होऊन स्मूथ टेक्स्चर आले पाहिजे.
४. हे सगळे मिश्रण चाळून घेतलेल्या मैदा,कोको पावडर आणि बेकिंग पावडर मध्ये मिक्स करा. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या. सगळे मिश्रण एकाच दिशेने फिरवत छान फेटून घ्या.
५. मिश्रण छान एकजीव झाले कि, त्यात दुध घालून पुन्हा फेटा.
६. व्हॅनीला इसेन्स  घालून मिक्स करा.
७. बेकिंग भांड्याला लोण्याचा हात लावून घ्या आणि वरती चिमटीने थोडासा मैदा भुरभुरा. मैदा भांड्याला चिकटला पाहिजे.जास्तीचा मैदा फुंकर मारून काढून टाका.
८. अलगदपणे तयार केलेले केकचे मिश्रण भांड्यात ओता. हाताने पसरून सपाट करून घ्या.
९. ओव्हन ३५० F तापमानाला प्रीहीट करा आणि ३० मिनिटे बेक करा. केक भांड्याच्या कडा सोडायला लागला याचा अर्थ केक पूर्ण बेक झाला. केकमध्ये टूथ पिक टोचून बघा. टूथ पिक स्वच्छ काहीही न चिकटता बाहेर आली याचा अर्थ केक झाला
१०. केक पूर्ण थंड झाला कि, अलगद बाहेर कडा आणि केकला बरोबर मधून आडवी चीर द्या. कापलेल्या भागावर वाईन आणि साखरेचे पाणी स्प्रे करा किंवा शिंपडा.
११. कापलेले भाग पुन्हा एकमेकांवर ठेवून केकचे तुकडे करा आणि सर्व्ह करा.