पावसाळ्यात बनवा झटपट भजी घरच्या घरी

सध्या पावसाळ्याचा ऋतु सुरू होत आहे. अशातच गरमा गरम भजी खाण्याची मजा काही वेगळीच आहे. चला तर मग ही भजी कशी करायची ते जाणून घेऊयात.....

 सध्या पावसाळ्याचा ऋतु सुरू होत आहे. अशातच गरमा गरम भजी खाण्याची मजा काही वेगळीच आहे. चला तर मग ही भजी कशी करायची ते जाणून घेऊयात….. 

साहित्य –  
१ मोठा लाल कांदा
तिखट, मीठ – चवीप्रमाणे
बेसन 
तेल तळण्यासाठी 
किंचित हळद
 चिमुटभर ओवा
मुठभर कोथींबीर
 
कृती –
कांदा अगदी बारीक उभा उभा कापावा. त्याच्या पाकळ्या नीट वेगवेगळ्या करुन त्यावर मीठ, तिखट, ओवा, हळद घालुन नीट मिसळुन १० मिनीटे बाजुला ठेवावे. १० मिनीटानंतर तळण्यासाठी तेल तापायला ठेवावे. तोपर्यंत कांद्याला पाणी सुटलेले असेल. त्यात थलथलीत भिजेल इतपत पीठ घालावे. पाणी अजीबात घालु नये. कोथींबीर घालुन त्यावर १ चमचाभर गरम तेल घालावे. नीट चमच्याने मिसळुन गरम तेलात भजी करुन दोन्ही बाजुने कुरकुरीत तळाव्यात.
 
टीप – १. ह्या भजीला खेकडा भजी असेही म्हणतात.
२. पीठ भिजवताना पाणी अजिबात वापरु नये.
३. शक्यतोवर लाल कांदा वापरावा. निदान पांढरा कांदा वापरु नये.
४. ही भजी कुरकुरीत होण्यासाठी सोडा घालायची गरज नाही. सोड्याने भजी तेलकट होतात.