mawa karanji

दिवाळी जवळ यायला लागली की प्रत्येक घरामध्ये फराळाची तयारी सुरु होते. दिवाळीमध्ये तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने करंजी बनवायची असेल तर मावा करंजी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ही करंजी कशी करायची ते पाहूयात .

दिवाळी(diwali recipes) जवळ यायला लागली की प्रत्येक घरामध्ये फराळाची तयारी सुरु होते. दिवाळीमध्ये तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने करंजी बनवायची असेल तर मावा करंजी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ही करंजी कशी करायची ते पाहूयात .

साहित्य :- १ कप मैदा, १ कप साजूक तूप,१/२ कप रवा,१ /४ ग्लास पाणी,१ कप पिठी साखर, १ कप भाजलेला खवा, १ कप बारीक सुकलेलं खोबरं, बदाम आणि पिस्त्याचे काप, १ चमचा चारोळ्या, केशर आणि चिमूटभर वेलची पूड.

कृती:- एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यावर त्यात अर्धा कप रवा भाजून घाला. यामध्ये सुकं खोबरे, चारोळी, बदाम, पिस्त्याचे काप, वेलची पूड, केशर, सर्व जिन्नस घाला. पॅनमधले सारण थंड झाल्यावर यामध्ये पिठी साखर, भाजलेला खवा मिसळा आणि सारण तयार करा.

एका भांड्यात मैदा घेऊन त्यामध्ये अर्धा कप तूप मिसळा या मध्ये थोडं थोडं करून कोमट पाणी घाला आणि पीठ मळून घ्या. थोड्या वेळासाठी हे मळलेले पीठ ओलसर कपड्याने झाकून ठेवा.

मळलेल्या पीठाचे एकसारखे करून लहान लहान गोळे बनवा. ते लहान पुरीसारखे लाटून त्या पारीमध्ये सारण भरून त्याच्या कडांना दुधाचा हात लावून करंज्याच्या साच्यामध्ये ठेऊन करंज्या करा. आता एका कढईत तूप टाकून गरम करण्यासाठी ठेवा. आता या करंज्या तुपात टाकून तळून घ्या.