moong dal laddu

दिवाळीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवत असतो.  पण आजकाल  पौष्टिक लाडू करण्याचा कल वाढला आहे. असाच एक लाडूचा पौष्टिक प्रकार आपण आज पाहणार आहोत. हा प्रकार म्हणजे मुगाचे पौष्टिक लाडू.

दिवाळीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवत असतो.  पण आजकाल  पौष्टिक लाडू करण्याचा कल वाढला आहे. असाच एक लाडूचा पौष्टिक प्रकार आपण आज पाहणार आहोत. हा प्रकार म्हणजे मुगाचे पौष्टिक लाडू.

साहित्य :- २ कप मुगाची डाळ स्वच्छ धुऊन, १०-१५ मिनिटे भिजवून, फडक्यावर वाळवून घ्या व मग भाजा, रवाळ दळून घ्या.

कृती :- साजूक तुपावर रवाळ पीठ भाजून घ्या. पीठ फार बारीक दळल्यास लाडू खाताना टाळ्याला चिकटतो, म्हणून ‘भुरी साखर’ घालून वळा. भुरी साखर अशी बनवा- दीड कप साखर व १ कप पाण्याचा पाक करत ठेवा. २ थेंब लिंबाचा रस व १ चमचा तूप घाला. पाक पक्का झाल्यावर गॅस बंद करा. ही साखर मिक्सरमध्ये दळून वापरा. या साखरेमुळे लाडू खमंग लागतो. मऊ केलेला गूळ घालूनही लाडू बनविता येतील. डाळीचं पीठ वरील पद्धतीने केल्यास लाडू पचायला हलका होतो. (लिंबाचा रस घातल्याने साखर स्वच्छ होईल.) पाक परातीत घालून जड भांड्याने घोटल्यासारखे केले तरी पांढरीशुभ्र साखर मिळेल.