‘या’ पाच गोष्टी करतात मैत्रीचे बंध घट्ट

कोणत्याही नात्यात एकमेकांचा आदर करणे खूप गरजेचे आहे. आपल्या मित्र-मैत्रीणीसमोर आपल्या जोडीदाराला वाटेल ते बोलू नका.  चारचौघात त्याला मान मिळवून द्या.

  नात्याचे धागे हे अत्यंत नाजुक असतात. त्यांना सांभाळणे खूप गरजेचे असते. कधी-कधी आपणास आपल्या जोडीदाराच्या मनातील अशा काही गोष्टीही ओळखता यायला हव्या, जे तो कधी सांगत नाही. पण मनातल्या मनात त्याबद्दल विचार नक्कीच करत असतो.  खाली दिलेल्या आहेत अशा पाच गोष्टी ज्या तुमच्या जोडीदाराच्या मनात असतात पण त्या बोलण्याविषयी तो कचरत असतो.

  सोबत वेळ घालविण्याची इच्छा
  प्रत्येक मुलाची इच्छा असते की, त्याने जास्तीत- जास्त वेळ आपल्या जोडीदारासोबत घालवावा. भलेही तो आपल्या मित्रांबरोबर मौज-मस्ती करण्यात एक्सपर्ट असेल, पण त्याच्या मनाला खरी शांतता तुमच्याजवळच येते. या प्रेमाच्या अनुभूतीसाठी आपला जोडीदार नक्कीच वाट पाहत असेल.

  जोडीदाराच्या सवयी बदलू नका
  कोणत्याच पुरुषाला त्याच्या सवयींवरुन त्याच्या जोडीदाराने टोमणे मारलेले आवडत नाही. जर आपण आपल्या जोडीदाराला कायम बदलण्याविषयी, मग ते त्याच्या बोलण्या-वागण्याच्या सवयी असो अथवा अजून दुसऱ्या सवयी. त्याला ते नक्कीच आवडणार नाही आणि त्याच्या मनात तुमची चुकीची प्रतिमा निर्माण होईल. तो तुमच्या प्रेमात स्वतःच बदलत जाईल. फक्त थोडा संयम ठेवा.

  स्वतःचा वेळ
  पुरुष हे लवकरच एखाद्या गोष्टीला कंटाळतात. त्यांना कायम नवनवीन अनुभवांची आस असते.  यामुळे जर आपल्याला त्याच्या मनात आपले वेगळे असे स्थान पक्के करायचे असेल तर त्यांना त्यांची वेगळी स्पेस द्या. त्यामुळे आपण नात्यात बांधले गेले आहोत असे त्याला वाटणार नाही.

  आदर
  कोणत्याही नात्यात एकमेकांचा आदर करणे खूप गरजेचे आहे. आपल्या मित्र-मैत्रीणीसमोर आपल्या जोडीदाराला वाटेल ते बोलू नका.  चारचौघात त्याला मान मिळवून द्या.

  प्रोत्साहन
  प्रत्येक पुरुषाची आंतरिक इच्छा असते की, त्याच्या जोडीदाराने त्याचे कौतुक करावे, प्रोत्साहन द्यावे. पण ही सांगण्यासारखी गोष्ट नाही. आपण आपल्या जोडीदाराचे कौतुक करा. त्याच्या कामात त्याला प्रोत्साहन द्या. आपणास  जी गोष्ट पटत नाही, ती प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न करा. यामुळे त्याच्या मनात तुमच्यासाठी असलेला आदर नक्कीच दुणावेल.