तेंदूपत्त्यातून १०० कोटींची खंडणी; माओवाद्यांच्या आर्थिक व्यवहारांवर सुरक्षा दलांचे लक्ष

तेंदूपत्त्याच्या माध्यमातून दंडकारण्यातील माओवाद्यांना सुमारे शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक खंडणी मिळते ((The Maoists get a ransom). माओवाद्यांच्या स्थानिक दलमपासून केंद्रीय समितीपर्यंत साऱ्यांच्या खर्चाचे नियोजन (The security forces are keeping a close eye on the Tendupatta season) या खंडणीतून केले जात असल्याने सुरक्षा दलाच्या नजरा तेंदूपत्ता हंगामावर केंद्रीत झाल्या आहेत.

  गडचिरोली (Gadchiroli).  तेंदूपत्त्याच्या माध्यमातून दंडकारण्यातील माओवाद्यांना सुमारे शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक खंडणी मिळते ((The Maoists get a ransom). माओवाद्यांच्या स्थानिक दलमपासून केंद्रीय समितीपर्यंत साऱ्यांच्या खर्चाचे नियोजन (The security forces are keeping a close eye on the Tendupatta season) या खंडणीतून केले जात असल्याने सुरक्षा दलाच्या नजरा तेंदूपत्ता हंगामावर केंद्रीत झाल्या आहेत. पैडीच्या जंगलातील माओवाद्यां विरोधातील कारवाईने ही बाब अधोरेखित झाली आहे.

  पैडीच्या जंगलात तेंदूपत्ता हंगामातील व्यवहारासाठी जमलेल्या १३ माओवाद्यांना सी-६०च्या पथकाने शुक्रवारी कंठस्नान घातले. या घटनेने दंडकारण्यातील तेंदूपत्ता चर्चेत आला आहे. गडचिरोलीसह बस्तर, ओडिशा, तेलंगण, आंध्र प्रदेश, झारखंडसह देशातील काही राज्यांत माओवादी चळवळ सक्रिय आहे. हा संपूर्ण परिसर एकमेकांना लागून आहे. या भागात बिडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा तेंदूपत्ता उत्पादित होतो. मे महिन्यात याचे संकलन केले जाते. १९८०च्या दशकात माओवाद्यांनी तेंदूपत्त्याची आदिवासींना मिळणाऱ्या मजुरीचा मुद्दा उभारून दंडकारण्यात आपले अस्तित्व स्थापित केले.

  शासकीय दरापेक्षा दुप्पट मजुरी तेंदूपत्ता कंत्राटदार माओवाद्यांच्या सांगण्यावरून आदिवासींना देत असत. हंगामापूर्वी कंत्राटदार माओवाद्यांच्या बैठकीला जात. तिथे निर्धारित झालेली मजुरी दिली जात असल्याने माओवाद्यांचा दंडकारण्यात प्रभाव वाढला. आदिवासींसाठी लढा लढतानाच माओवाद्यांनी तेंदूपत्याला आपल्या आर्थिक सुबत्तेचे साधन बनविले. आज माओवादी या खंडणीतून हजारो कोटी रुपये जमवित आहेत.

  उत्तर गडचिरोलीतील चळवळीला धक्का
  तेंदूपत्ता हंगामात माओवाद्यांच्या अर्थकारणाच्या निमित्ताने होणाऱ्या घडामोडी गडचिरोली पोलिसांच्या नजरेत होत्‍या. त्यातूनच खबऱ्यांनी माओवाद्यांच्या सक्रिय हालचालींची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली. कोटमी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कसनसूर आणि कंपनी दलमच्या माओवाद्यांची बैठक तेंदूपत्ता हंगामाच्या अनुषंगाने होणार असल्याची माहिती मिळाली.

  छत्तीसगडमधून सर्वाधिक रक्कम
  माओवाद्यांना खंडणीचा सर्वांत मोठा वाटा छत्तीसगडमधून मिळतो. २००२मध्ये तेलंगणातील काही बड्या कंत्राटदाराकडून माओवाद्यांना पुरविण्यात आलेल्या पैशांचे व्यवहार उघड झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईने तब्बल तीन वर्षे गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता हंगामाकडे तेलंगणातील बड्या कंत्राटदारांनी पाठ फिरवली होती. २००५नंतर व्यवहार पुन्हा सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल आणि माओवादविरोधी अभियानाचे अतिरिक्त अधीक्षक मनिष कलवानिया, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वात गुरुवारी सायंकाळी १२ सी-६० कमांडो पथक गडचिरोली मुख्यालयातून रवाना झाले.

  रात्रीपासून या भागातील माओवाद्यांना घेराव करण्याची प्रत्यक्ष योजना अमलात आणायला सुरुवात केली. रात्रीपासून या भागात मुक्कामाला असलेल्या माओवाद्यांना सकाळी घेरण्यात आले. एक तासाच्या चकमकीमध्ये १३ माओवादी ठार झाले. उत्तर गडचिरोलीतील माओवादी चळवळीला या घटनेने मोठा हादरा बसला आहे. दरम्यान, या घटनेनंतर ठार झालेल्या माओवाद्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला असून रात्री उशिरापर्यंत मृतदेहांचे पंचनामा सुरू होते.