गडचिरोलीत महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटकडून १३ नक्षलवाद्यांचा खात्मा; ६ नक्षलींचे मृतदेह ताब्यात

गडचिरोलीच्या एटापल्लीच्या जंगलात पोलिसांच्या कारवाईत कमीतकमी १३ नक्षलवाद्याना कंठस्थान घातल्याची माहिती,अशी माहिती डीआयजी संदीप पाटील,गडचिरोलीचे पोलीसयांनी दिली आहे.

    गडचिरोली:महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भाग असलेलया गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या(Maharashtra  police) सी-६० युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून आहे.या चकमकीत १३ नक्षलवाद्यांना ठार (Naxalites killed) करण्यात आले आहे. पोलिसांनी एकूण ५ जणांचे मृतदेह जंगलातून बाहेर आणत ताब्यात घेतले आहेत.

    गडचिरोलीच्या एटापल्लीच्या जंगलात पोलिसांच्या कारवाईत कमीतकमी १३ नक्षलवाद्याना कंठस्थान घातल्याची माहिती,अशी माहिती डीआयजी संदीप पाटील,गडचिरोलीचे पोलीसयांनी दिली आहे. पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर निघालेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलीस विभागाकडून हल्ला करण्यात आला.

    नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वीच गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला केला होता. या ग्रॅनाईटचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु, नक्षलवाद्यांनी पोलीस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न करणं ही मोठी घटना मानली जात आहे. पोलीस स्टेशन पर्यंत नक्षलवादी पोहोचल्यानं पोलिसांना सतर्क व्हावं लागणार आहे. त्यात, पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.