प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

गेल्या अनेक वर्षांपासून दंडकारण्यासह देशाच्या माओवाद प्रभावित भागात (Maoist affected areas) माओवाद्यांच्या हिंसक कारवाया (violent activities) सुरू आहेत. सुरक्षा दल (the security forces) आणि माओवादी यांच्यातल्या संघर्षात व कोरोनाचा माओवाद्यांना गेल्या वर्षभरात मोठा हादरा बसला असून यामुळे संघटनेचे कशा पद्धतीने नुकसान झाले आहे.

    गडचिरोली (Gadchiroli).  गेल्या अनेक वर्षांपासून दंडकारण्यासह देशाच्या माओवाद प्रभावित भागात (Maoist affected areas) माओवाद्यांच्या हिंसक कारवाया (violent activities) सुरू आहेत. सुरक्षा दल (the security forces) आणि माओवादी यांच्यातल्या संघर्षात व कोरोनाचा माओवाद्यांना गेल्या वर्षभरात मोठा हादरा बसला असून यामुळे संघटनेचे कशा पद्धतीने नुकसान झाले आहे. याचा लेखाजोखा माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने (The Central Committee of the Maoists) पत्रामधून उघड केला. आहे. गेल्या वर्षभरात विविध चकमकींसह इतर कारणांमुळे तब्बल १६० माओवाद्यांचा मृत्यू झाल्याची कबुली माओवाद्यांनी पत्रांमधून दिली आहे.

    गेल्या वर्षभरात दंडकारण्यात सुरक्षा दलासोबत झालेला संघर्ष, कोरोनामुळे माओवादी संघटनेवर पडलेला प्रभाव, देशभरातल्या अनेक मोठ्या घटनांसंदर्भात माओवाद्यांची भूमिका, माओवादी चळवळीचे झालेले नुकसान यासह अनेक मुद्यांवर माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने तब्बल १८ पानांचे एक पत्र जारी केले आहे.

    या पत्रातून देण्यात आलेल्या माहितीनुसार तब्बल तीस महिला माओवाद्यांचा मृत्यू झाला असून एकट्या गडचिरोली जिल्ह्यात देशभराच्या तुलनेत सर्वाधिक २८ माओवादी पोलिसांच्या चकमकीत ठार झाले आहेत. सुरक्षा दलांसोबत लढत असताना झालेल्या चुका टाळून क्रांतीसाठी संघर्ष करण्याचे आवाहन माओवाद्यांच्या कॅडरला केले आहे. त्याचप्रमाणे २८ जुलैचा शहीद सप्ताह साजरा करण्याचे आवाहनही पत्रात करण्यात आले आहे.

    वर्षभरात दंडकारण्यासह देशभरात तब्बल १६० माओवाद्यांचा मृत्यू झाला असून यात पोलिस आणि माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तब्बल ९५ माओवादी ठार झाल्याचा उल्लेख आहे. बिहार, झारखंडमध्ये ११ ओरिसात १४, एमएमसीमध्ये ८, तेलंगणात १४ आणि दंडकारण्यामध्ये १०१ माओवाद्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३० महिला माओवाद्यांचा समावेश असून सर्वाधिक महिला माओवादी या गडचिरोली जिल्ह्यात मृत्युमुखी पडल्या आहेत. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या या पत्रामध्ये कोरोना महामारीसह काही अपघाताच्या घटनांमध्ये तेरा माओवाद्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत जहालवादी नेता हरीभूषण च्या नावासह सविस्तर विश्लेषण माओवाद्यांनी या पत्रातून केले आहे.

    याशिवाय ७२ माओवादी ठार झालेले आहेत, त्याची माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करत याबाबत सविस्तर पुढच्या काळात सांगू असे माओवाद्यांनी स्पष्ट केले आहे. मृत्युमुखी पडलेल्या मा ओवाद्यांमध्ये १० विभागीय समितीचे सदस्य ३७ एरिया कमिटी सदस्य ३५ पार्टी सदस्य ११ पीपुल्स गुरील्ला आर्मीचे सदस्य आणि २२ जन मिलिशिया कमांडर यांचा समावेश आहे. माओवाद्यांनी मृत्युमुखी पडलेल्या काही माओवादी नेत्यांच्या नावांचा आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख करून माओवादी चळवळीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याचा प्रयत्नही या पत्रातून केला आहे.