गडचिरोली जिल्ह्यात १७ बाधितांचा मृत्यू; दिवसभरात ६२७ कोरोनामुक्त

जिल्ह्यात मागील 24 तासात 17 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 627 रुग्ण कोरोनमुक्त झाले असून 516 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुहे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 23012 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 18287 वर पोहचली आहे. तसेच सध्या 4260 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

    गडचिरोली (Gadchiroli).  जिल्ह्यात मागील 24 तासात 17 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 627 रुग्ण कोरोनमुक्त झाले असून 516 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुहे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 23012 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 18287 वर पोहचली आहे. तसेच सध्या 4260 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

    आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 465 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 17 नवीन मृत्यूमध्ये रामकृष्णपूर येथील 36 वर्षीय पुरुष, जोगीसाखरा येथील 51 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 68 वर्षीय महिला, अहेरीतील 38 वर्षीय पुरुष, ब्रम्हपुरी तालुक्यातील 58 वर्षीय पुरुष, अहेरीतील 61 वर्षीय महिला, वाघाडा बर्डी येथील 66 वर्षीय महिला, उमरी येथील 40 वर्षीय पुरुष, गडचिरोली 48 वर्षीय महिला, गडचिरोली नवेगाव येथील 75 वर्षीय महिला, विवेकानंद नगरातील 55 वर्षीय पुरुष, सर्वोदय वार्डातील 73 वर्षीय पुरुष, आरमोरी येथील 53 वर्षीय पुरुष, गडचिरोलीतील 75 वर्षीय पुरुष, वनश्री कॉलनीतील 65 वर्षीय पुरुष, कुरुड येथील 65 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.47 टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 18.51 टक्के तर मृत्यू दर 2.02 टक्के एवढा झाला आहे.

    ५१६ नवीन बाधित
    नवीन 516 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 177, अहेरी तालुक्यातील 58, आरमोरी 30, भामरागड तालुक्यातील 7, चामोर्शी तालुक्यातील 42, धानोरा तालुक्यातील 26, एटापल्ली तालुक्यातील 36, कोरची तालुक्यातील 9, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 31, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 22, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 19 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 59 जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 627 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 222, अहेरी 66, आरमोरी 45, भामरागड 18, चामोर्शी 61, धानोरा 04, एटापल्ली 26, मुलचेरा 10, सिरोंचा 26, कोरची 38, कुरखेडा 21, तसेच वडसा येथील 90 जणांचा समावेश आहे.