गडचिरोलीतील २ सीआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण

  • रविवरारी सकाळी अंत्यसंस्काराला हैद्राबाद येथून आलेल्या २ पुरुष आणि १ महिला कोरोनाबाधित आढळली आहे. तर बाहेरुन आल्यावर कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या २०६ झाली आहे तर जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३३८ वर गेली आहे. तर आता पर्यंत १३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आणि १ रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. गडचिरोलातील सीआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित जवानांची संख्या चिता वाढवणारी आहे. शनिवारी ७२ जवानांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री उशिरा २ जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. तर भामरागड येथील वीलगीकरणात ठेवलेल्या ९ वर्षीय मुलीसह २ जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. हे तिन्ही लोक वेगेवेगळ्या ठिकाणांहून आलेले होते. परंतु त्यांच्या कुटूंबीयांचे कोरोना अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. 

रविवरारी सकाळी अंत्यसंस्काराला हैद्राबाद येथून आलेल्या २ पुरुष आणि १ महिला कोरोनाबाधित आढळली आहे. तर बाहेरुन आल्यावर कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या २०६ झाली आहे तर जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३३८ वर गेली आहे. तर आता पर्यंत १३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आणि १ रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.