covid 19 positive

  • २१ कोरोनामुक्त
  • गेल्या दोन दिवसात कोरोनामुळे ४ मृत्यूची नोंद

गडचिरोली.  गडचिरोली जिल्ह्यात (gadchiroli district) आज नवीन ५६ कोरोना बाधित (new corona positive) आढळून आले. यामध्ये गडचिरोली येथील १९ रुग्णांचा समावेश आहे. या नवीन १९ मध्ये एक गरोदर मातेसह इतर स्थानिक १८ जणांचा समावेश आहे. तर वडसा येथील एक जण, चामोर्शी येथील ६ यामध्ये एक गरोदर, इतर पाच जणांचा समावेश आहे. अहेरी येथील १९ जण यात कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेले १७ जन बाधित आढळून आले. तर इतर स्थानिक २ जण कोरोना बाधीत आढळून आले. सिरोंच्या तालुक्यांमध्ये स्थानिक ३ जण कोरोना बाधित आढळले. आरमोरी तालुक्यात ५ स्थानिक, मुलचेरा येथे १ जण, धानोरा २ कोरोना बाधित आढळून आले. अशाप्रकारे जिल्ह्यात आज एकूण ५६ जण नवीन कोरोना बाधित आढळून आले.

आज २१ जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली ४, चामोर्शी ४, धानोरा ६, वडसा ३ तर अहेरी येथील ४ जणांचा समावेश आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये गडचिरोली शहरातील ३ जण तर धानोरा येथील एका महिलेचा समावेश आहे. गडचिरोली शहरातील तीन जणांमध्ये रामनगर येथील एक पुरुष तर चंद्रपूर सावली तालुक्यातील कर्करोग पिडीताचा मृत्यू गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला आहे. तसेच गडचिरोली शहरातीलच एक ७० वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर धानोरा येथील एक महिला कॅन्सर पीडित होती तिचाही मृत्यू कोरोनामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला. अशा प्रकारे गेल्या दोन दिवसात चार मृत्यूची कोरोना मुळे नोंद झाली. तर यापूर्वी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ७ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी ४३२ झाली. आत्तापर्यंत एकूण ७ मृत्यू आहेत. तर १२२३ कोरोनामुक्त आहेत. एकंदरीत गडचिरोली जिल्ह्यातील आत्तापर्यंतची कोरोना बाधितांची संख्या १६६२ झाली.