विविध धाडीत दारूसह ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त; देसाईगंज पोलिसांची कारवाई

स्थानिक पोलिसांनी आज, ४ एप्रिल रोजी विविध ठिकाणी धाड टाकून दारूसह ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह चार अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    देसाईगंज (Desaiganj).  स्थानिक पोलिसांनी आज, ४ एप्रिल रोजी विविध ठिकाणी धाड टाकून दारूसह ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह चार अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एका महिलेकडून 3 हजार रुपये किंमतीची 10 लिटर हातभट्टी मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली. तसेच 12 हजार रुपये किमतीचा तीन ड्रम मोहसडवा ताब्यात घेत महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुस-या कारवाईत 6 हजार रुपयांची हातभट्टी दारू व 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नंदकिशोर दादाजी कावळे (48), उमेश गिरीधर मोटघरे (45) दोन्ही रा. भगतसिंग वार्ड, देसाईगंज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या कारवाईत 6 हजार रुपये किंमतीची 20 लिटर हातभट्टी मोहदारू जप्त करीत जितेंद्र घनशाम रामटेके (26) रा. भगतसिंग वार्ड, देसाईगंज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये एकूण दारूसह 64 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने केली.