corona positive

  • 16 कोरोनामुक्त

गडचिरोली. आज ६२ नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील वेगवेगळया ठिकाणी पुन्हा २४ जण बाधित आढळून आले. यामध्ये इतर जिल्हयातील ४, एक भामरागड कोठी येथील पीएसआय, जिल्हा रूग्णालयातील ४ रूग्ण, इतरांच्या संपर्कातील १५ तीव्र जोखमीचे स्थानिक कोरोना बाधित आढळून आले आहेत.  सिरोंचा येथील १९ नवीन यात ५ बिहारचे, ३ तेलंगणाचे, ३ इतर जिल्हयातील प्रवास्यांचा समावेश आहे. तर ८ जण स्थानिक कोरोना बाधिताच्या संपर्कातील आहेत. एका आरोग्य कर्मचाऱ्यासह ३ प्रवासी असे ४ जण अहेरीमध्ये बाधित आढळून आले आहेत. वडसा १, धानोरा ३, आरमोरी ७ यामध्ये ५ इतर बाधिताच्या संपर्कातील तर २ इतर रूग्ण बाधित आढळले आहेत. चामोर्शी येथे पुन्हा ४ जण कोरोना बाधिताच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे कोरोना बाधित आढळले असे आज एकुण ६२ नवीन कोरोना बाधित आढळले.

तर सक्रिय कोरोना बाधितांपैकी आज जिल्हयात १६ जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली येथील ८, सिरोंचा व धानोरा येथील प्रत्येकर दोन दोन तर  वडसा, चामोर्शी, एटापल्ली, आरमोरी तालुक्यातील प्रत्येकी एक एक  असे एकूण १६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ३८७ झाली असून एकुण बाधित संख्या १५६५ झाली आहे. आत्तापर्यंत एकूण ११७५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर तिघांचा दुदैवी मृत्यू  झाला आहे. यात गडचिरोली येथे चंद्रपूर ब्रहमपुरीचा रहीवासी एक, सिरोंचा येथील व्यक्तीचा हैद्रबाद येथे झालेला एक मृत्यू व कुरखेडा येथील आरोग्य कर्मचाऱ्या मृत्यू यांचा समावेश आहे.