येत्या ३ ऑगस्टपासून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळा सुरू करण्यात येणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

येत्या ३ ऑगस्टपासून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची बैठक घेतली होती.

या बैठकीत ३ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच सर्व शाळा सॅनिटायझ करून घ्याव्यात तसेच शाळांना मास्क आणि सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू तातडीने पुरवाव्यात, असे निर्देश वडेट्टीवार यांनी दिले आहेत.     

गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित वनहक्क दाव्यांच्या मंजुरीबाबत प्रादेशिक स्तरावर मंजुरीचे आदेश असावेत, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच उपवनसंरक्षकांकडे ५ हेक्टपर्यंतचे अधिकार ठेवण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.