पूल बांधकामाचे भूमिपूजन करताना मान्यवर
पूल बांधकामाचे भूमिपूजन करताना मान्यवर

आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत कोजबीअंतर्गत येत असलेल्या करपडा-कोजबी या रस्यावरील नाल्यावर पूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आल्याने 50 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे.

    आरमोरी (Armory).  तालुक्यातील ग्रामपंचायत कोजबीअंतर्गत येत असलेल्या करपडा-कोजबी या रस्यावरील नाल्यावर पूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आल्याने 50 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे.

    पावसाळयाच्या दिवसात नाल्यास पाणी राहत असल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसात शेती करण्यासाठी करपडा शिवारात सात ते आठ किलोमीटरची पायपीट करून लोहारा-करपडा मार्गे शेतावर जावे लागत होते. त्यामुळे शेती करण्यासाठी अडचणी येत होत्या. या पूल बांधकामासाठी शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने अनेकदा पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेऊन या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या मनीषा दोनाडकर यांनी जिल्हा नियोजन आराखड्यात मागणी ठेवून 43 लाख रुपये किंमतीचे पूल मंजूर करून घेतले. त्यामुळे गेल्या 50 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.

    या पुलाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या मनीषा दोनाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच वैशाली डोंगरवार, उपसरपंच बळीराम घुटके, ग्रामपंचायत सदस्य राजेश्वर दुमाने, सुषमा बोदेले, दुमन मोहिते, प्रीती रणदिवे, माजी सरपंच भीमराव मुल्लेवार, माजी सरपंच विनोद मानकर, माजी पोलीस पाटील मनोहर मुल्लेवार, अनिल बरडे, प्रल्हाद ताडाम, त्र्यंबक नाकाडे, कंत्राटदार, अभियंता झापे, माणिक मानकर, दिनेश बनकर उपस्थित होते.