गडचिरोलीतील नक्षलवाद्यांना घाम फोडणारी पोलिसांची सी-६० तुकडी; जाणून घ्या ‘या’ तुकडीविषयी

डचिरोलीमध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईमध्ये तब्बल १३ नक्षलींचा खात्मा करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे. या कारवाईसाठी पोलिसांच्या पथकातील सी-६० (सी सिक्स्टी)तुकडीचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे.

  गडचिरोली: महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोलीला ओळखले जाते. या ठिकाणी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या चकमकी महाराष्ट्राला नवीन नाहीत. अनेकदा कारवायांमध्ये नक्षलवाद्यांना कंठस्थान घालत असताना महाराष्ट्र पोलीस दलाचे जवानही शहीद झाले आहेत.   दोन दिवसापूर्वी गडचिरोलीमध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईमध्ये तब्बल १३ नक्षलींचा खात्मा करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे. या कारवाईसाठी पोलिसांच्या पथकातील सी-६० (सी सिक्स्टी)तुकडीचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. मागली काही महिन्यांपासून पोलीस व नक्षलींमध्ये चकमक झाली की साधारण ४-६ नक्षलींचा खात्मा करण्यात यश येत होते. मात्र अनेक माओवादी पळून जाण्यात यशस्वी होत होते. परंतु नुकत्याच झालेल्या करवाईमध्ये सी ६० च्या तुकडीने सर्व गोष्टींचा , त्रुटींचा सखोल अभ्यास करून आपली कामगिरी फत्ते केलीव हे ऑपरेशन यशस्वी केले.

  सी-६० (सी सिक्स्टी) तुकडी काय आहे?

  साधरण ८० च्या दशकामध्ये जेव्हा गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या आदिवासी बाहुला भागात जेव्हा नक्षलवादी आपले पाय रोवोपोन उभे रहात होते. त्यावेळी गडचिरोलीचे एस पी असणाऱ्या के पी रघुवंशी यांनी १९९० मध्ये ६० अश्या पोलिसांची निवड करत टीम तयार केली. या टीमला नक्षली परिसराची इथंभूत माहिती असेल , त्या पोलिसांना नक्षलींची, त्या परिसरातील स्थानिक लोकांची भाषा बोलता येईल. या टीमद्वारे अंत्यत अचूकपणे लक्ष साधण्यासाठी ओळखले जाते. पुढे या सी-६०मध्ये अनेक तरुण कमांडो सहभागी झाले, या तुकडीला क्रॅक कमांडो म्हणून ओळखले जाते.

  सी-६० चे असे असते ट्रेनिंग

  या टीममधील कमांडोना खास अतिदुर्गम, पहाडी, संवेदनशील भागांतील कारवायांसाठीचे प्रशिक्षण दिले जाते. प्राधान्याने जंगल युद्धासाठी प्रशिक्षण दिले जाते. ऊन, वारा, पाऊस, दिवस-रात्र अश्या कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी खडतर असे प्रशिक्षण दिले जाते. शारीरिक व मानसिकदृष्टया सक्षम केले जाते. अत्याधुनिक पद्धातीचे तंत्रज्ञान हाताळण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. हैद्राबादच्या ग्रे – हौन्ड्स, मनेसरचे एनएसजी आणि पूर्वांचलच्या आर्मी वॉरफेअर कॅम्प मध्येहीहे ट्रेनिंग दिले जाते.

  नक्षलींवर कारवाई करण्यासोबत दुर्गम भागातील आदिवासी लोकांसोबत सुसंवाद साधून मूलभूत प्रश्नही सोडवले आहेत. अनेकदा या कामांमुळे स्थानिक लोकांशी ओळख होते,  आपुलकीचे नाते तयार होते. त्यातूनच नक्षली कारवाईमध्ये गुप्त माहिती देण्यासाठी मदत होते. नुकत्याच झालेल्या कारवाईमध्येही कमांडोना अशाच पध्द्तीने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी व शुक्रवारी झालेलं ऑपरेशन करण्यात आले आहे.

  नक्षली ऑपरेशनमधील रिअल हिरो

  नुकत्याच झालेल्या सी ६० च्या ऑपरेशनमध्ये काही कमांडो रिअल हिरो ठरले यामध्ये उप अधीक्षक (नक्षल अभियान) भाऊसाहेब ढोले यांचा समावेश होता, ज्यांनी स्वतःच्या पसंतीने ही जिकिरीची पोस्टिंग घेतली आणि आताच्या सह-असंख्य एन्काउंटर आणि नक्षलींच्या आत्मसमर्पणांच्या कारवायांमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यांनतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक (नक्षल ऑपरेशन्स) म्हणून २४ ऑगस्ट पासून अत्यंत धडाकेदार कारकीर्द निभावत असलेले मनीष कलवानिया ज्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर हे संपूर्ण ऑपरेशन अचूक योजनाबद्ध केले. गडचिरोली एस पी अंकित गोयल यांनी या ऑपरेशनच्या प्रत्येक टप्प्याच्या प्लांनिंगला अंतिम स्वरूप देत हिरवा कंदील दाखवला. डीआयजी गडचिरोली रेंज संदीप पाटील यांनी गेल्या सहा महिन्याच्या आपल्या सर्व ऑपरेशन्सच्या चुकांचा गोयल आणि कलवानीया यांच्याबरोबर सतत आढावा घेत एक आयडीयल ऑपरेशन कसे असावे याला मूर्त स्वरूप दिले आहे.