पर्लकोटा नदीने उलटली धोक्याची पातळी, भामरागडमध्ये शेकडो घरे पाण्याखाली

गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील शहरात पूर आला आहे. शहरांतील घरात पाणी शिरायला लागल्याने अनेक नागरिकांची तारांबळ उडाली होती. पूराचे पाणी सातत्याने वाढायला लागल्यास तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागडमधील पर्लकोटा नदीने रौद्र रुप धारण केले आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील शहरांत पूर स्थिती तयार झाली आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने भामरागड तालुक्यातील शहरांत पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक घरांत पाणी शिरले आहे. तसेच काही नागरिकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. 

गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील शहरांत पूर आला आहे. शहरांतील घरात पाणी शिरायला लागल्याने अनेक नागरिकांची तारांबळ उडाली होती. पूराचे पाणी सातत्याने वाढायला लागल्यास तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

शहरात पूर आल्याने अनेक नागरिक घरात अडकून पडले आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने पूरग्रस्त भागात रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली आहे. शहरात मध्यरात्री अचानक पूर आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. तसेच पोलीस प्रशासन रेस्क्यू बोटच्या सहाय्याने पूराच्या तडाख्यात अडकून राहिलेल्या नागरिकांचा शोध सुरु आहे. 

स्थानिक महसूल प्रशासनाने पूर परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष रणनीती तयार केली असल्याचे सांगितले आहे. शहरातील प्रत्येक भागात मदतकार्य पोहोचवलेले आहे. तसेच अतिरिक्त रेस्क्यू बोट्स मागवल्या गेल्या आहेत. रेस्क्यू करण्यात आलेल्या नागरिकांना राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. बचावकार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष सॅटेाईट मोबाईल देण्यात आले आहेत. या सर्व उपाय योजनांवरुन प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे समजते आहे.