तीन ड्रम गुळाचा सडवा नष्ट; गाव संघटना व मुक्तीपथची संयुक्त कृती

सिरोंचा पोलिस स्टेशनपासून १५ किमी अंतरावरील कोटा पोचमपल्ली येथे गाव संघटन व मुक्तीपथ तालुका चमूने अहिंसक कृती करीत एका दारूविक्रेत्याच्या घर परिसरात असलेला तीन ड्रम गुळाचा सडवा नष्ट केला आहे.

    गडचिरोली (Gadchiroli).  सिरोंचा पोलिस स्टेशनपासून 15 किमी अंतरावरील कोटा पोचमपल्ली येथे गाव संघटन व मुक्तीपथ तालुका चमूने अहिंसक कृती करीत एका दारूविक्रेत्याच्या घर परिसरात असलेला तीन ड्रम गुळाचा सडवा नष्ट केला आहे.

    सिरोंचा तालुक्यातील कोटा पोचमपल्ली येथे गाव संघटनेच्या प्रयत्नांतून अवैध दारूविक्री बंद आहे. मात्र, गावातील एक मुजोर दारूविक्रेत्याने दारूविक्री करण्याच्या उद्देशाने घराजवळ गुळाचा सडवा टाकला होता. याबाबतची माहिती गाव संघटन व मुक्तिपथ तालुका चमूला प्राप्त होताच अहिंसक कृतीचे नियोजन केले.

    त्यानुसार दारू विक्रेत्याच्या घर परिसराची तपासणी केली असता जमिनीत मोठे तीन ड्रम गाळून गुळाचा सडवा टाकला असल्याचे दिसून आले. एकूण 18 हजार रुपये किंमतीचा तीन ड्रम गुळाचा सडवा नष्ट करण्यात आला. तसेच गावात पुन्हा दारूविक्री न करण्याची तंबी दारूविक्रेत्यास देण्यात आली.