एकनाथ शिंदे यांचे नक्षलग्रस्त भागातील महिला पोलिस, आदिवासींसोबत रक्षाबंधन साजरे; हेडरी पोलीस मदत केंद्राला दिली भेट

पालकमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाले होते. आढावा सभा झाल्यावर त्यांनी अतिदुर्गम, आदिवासीबहुल नक्षल्यांच्या कारवायांचे केंद्र असलेल्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील पोलीस मदत केंद्राला भेट दिली.

    गडचिरोली (Gadchiroli): जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Guardian Minister Eknath Shinde) यांनी रविवारी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली कारवायांचे केंद्रस्थान (the epicenter of Naxal activities) असलेल्या एटापल्ली तालुक्यातील (Etapalli taluka) हेडरी येथील पोलिस आऊटपोस्टला (police outpost at Headri) भेट दिली. यानंतर त्यांनी पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस, पोलीस कुटुंबातील महिला आणि स्थानिक आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. याप्रसंगी उपस्थित सर्व महिला भगिनींना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

    पालकमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाले होते. आढावा सभा झाल्यावर त्यांनी अतिदुर्गम, आदिवासीबहुल नक्षल्यांच्या कारवायांचे केंद्र असलेल्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील पोलीस मदत केंद्राला भेट दिली.

    यावेळी त्यांनी नक्षली कारवायांचा धोका पत्करून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधव आणि भगिनींना ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच त्यांना कर्तव्य बजावताना येणाऱ्या सर्व समस्या सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

    यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सांगला आणि सर्व पोलीस बांधव त्यांचे कुटुंबातील आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.